विज्ञानाने उलगडले ब्रह्मांडातील आतापर्यंतचे सर्वात मोठे रहस्य, पुणे शहराचा काय आहे संबंध?
Pune News : बिग बँगनंतर स्फोटातून निर्माण झालेल्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. परंतु त्यात अजून यश आले नाही. आता ब्रह्मांडासंदर्भातील आणखी एका संशोधनास यश आले आहे.
पुणे : ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली? या प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. जगभरातील शास्त्रज्ञ त्यासाठी अनेक वर्षांपासून मेहनत करत आहे. चंद्र, तारे, आकाशगंगा अन् ब्रह्मांड कसे निर्माण झाले हे शोधण्यासाठी गॉड पार्टीकल नावाने संशोधन सुरु आहे. त्यातून ब्रह्मांडाची निर्मिती कशी होणार? हे समजणार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु अल्बर्ट आइंस्टीन या शास्त्रज्ञांनी जे काही म्हटले होते, त्यासंदर्भात मोठे यश आले आहे. त्याला पुणे शहरातील वाटा मोठा आहे.
काय निर्माण झाले संशोधन
जगभरातील खगोल वैज्ञानिकांना मोठे यश मिळाले आहे. प्रथमच ब्रह्मांडात असणाऱ्या गुरुत्वाकर्षण तरंगांचा आवाज ऐकण्यात यश आले आहे. हे गुरुत्वाकर्षण तरंग असल्याचा दावा महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइंस्टीन यांनी अनेक वर्षांपूर्वीच केला होता. द एस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. पंधरा वर्षांपासून या विषयावर जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत होते. अखेर त्यांना यश आले आहे.
पुणे शहराचा काय आहे संबंध
ब्रह्मांडातील गुरुत्वाकर्षण तरंग ऐकण्याचा संबंध पुणे शहराशी आहे. या संशोधनात देशातील सात संशोधन संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यात पुणे येथील मेट्रोवेव रेडियो टेलीस्कोपचा (यूजीएमआरटी) समावेश होता. पुणे शहरापासून जवळ असणाऱ्या नारायणगाव येथे जायंट मेट्रोवेव रेडियो टेलीस्कोप बसवला गेला आहे. लो-पिच असणाऱ्या गुरुत्वाकर्षण तरंगांच्या संशोधनासाठी जगभरातील सहा रिडियो टेलीस्कोपचा वापर केला गेला. त्यात पुणे शहरात असणारी मेट्रोवेव रेडियो टेलीस्कोपसुद्धा आहे. या संशोधनासाठी जगभरातील 190 वैज्ञानिकांची टीम गेल्या पंधरा वर्षांपासून संशोधन करत होती.
कधीपासून संशोधन होते सुरु
गुरुत्वाकर्षण तरंगसंदर्भातील संशोधन 2002 पासून सुरु होते. त्यात भारतातील NCRA (पुणे), TIFR (मुंबई), IIT (रुडकी), IISER (भोपाल), IIT (हैदराबाद), IMSc (चेन्नई) व आरआरआई (बेंगळुरु) सोबत जपानची कुमामोटो विद्यापीठातील संशोधक सहभागी होते. या संशोधनामुळे ब्रह्मांडतील तरंगाचा आवाज ऐकण्यात यश आले आहे. या संशोधनामुळे ब्लॅक होल्ससंदर्भात अधिक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.