AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune BJP : चंद्रकांत पाटील, मेधा कुलकर्णी वादाला यु टर्न, पक्षाची शिस्त मोडल्याचा कोणी केला आरोप?

chandrakant patil and medha kulkarni : पुणे भारतीय जनता पक्षातील वाद चव्हट्यावर येत आहे. कोथरुडमधील दोन आजी, माजी आमदारांमध्ये हा वाद सुरु आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मेधा कुलकर्णी यांना लक्ष केले गेले आहे.

Pune BJP : चंद्रकांत पाटील, मेधा कुलकर्णी वादाला यु टर्न, पक्षाची शिस्त मोडल्याचा कोणी केला आरोप?
medha kulkarni and chandrakant patil
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 8:23 AM

योगेश बोरसे, पुणे | 14 ऑगस्ट 2023 : शिस्तबद्ध पक्ष म्हटला जाणारा भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये सुरु आहे. पुणे शहरातील चांदणी चौक पुलाच्या निमित्ताने हा वाद माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी माध्यमांसमोर मांडला. त्यानंतर उद्घाटन समारंभात मेधा कुलकर्णी यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. तसेच केंद्रीय नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आता या वादाला पुन्हा यु टर्न मिळाला आहे. भाजप कोथरुड मंडळ अध्यक्षांनी मेधा कुलकर्णी यांना घेरले आहे.

का झाल्या मेधा कुळकर्णी नाराज

पुणे कोथरुडमधील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. आपण जुन्या कार्यकर्ते असताना पुणे शहरातील भाजप नेत्यांकडून डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेवरुन त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा त्यांनी साधला. परंतु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना यावर काही प्रतिक्रिया दिली नव्हती.

आता मेधा कुलकर्णी यांच्यावर आरोप

मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत पाटील वादात कोथरूड मंडल अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे पुनीत जोशी यांनी उडी घेतली. मेधा कुलकर्णी यांच्याबाबत भाजप कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मेधा कुलकर्णी सातत्याने पक्ष शिस्त मोडत असल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे, असा आरोप जोशी यांनी केला.

हे सुद्धा वाचा

विचारला हा प्रश्न

निमंत्रण पत्रिकेत मेधा कुलकर्णी यांचे छायाचित्र नाही, हा त्यांचा आक्षेप होता. मात्र शहरातील २४० जाहिरात फलकांवर मेधा कुलकर्णी यांचे छायाचित्र लावले होते, ही बाब त्यांनी दुर्लक्षित का केली? नाराजी असली तरी ती जाहीर करायची नाही, अशी पक्षाची शिकवण आहे. आधी पक्ष नंतर व्यक्ती ही पक्षाची विचारधारा आहे, मात्र ती दुर्लक्षित करून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचा बद्दल आश्चर्य वाटत आहे, अशी भूमिका पुनीत जोशी यांनी सोशल मीडियातून मांडली.

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.