पुणे भाजपला धक्के, तीन महिन्यांतच तीन मोठे नेते गमावले, ही पोकळी कशी भरणार?

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे वय जाण्याचे नव्हते. उलट ते दोघेही भाजपचे उभरते नेते होते. परंतु त्यांनी अकाली एक्झीट घेतली. संघटनात्मक पातळीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरावर एक विशिष्ट प्रभाव निर्माण करण्याची त्यांच्यात क्षमता होती.

पुणे भाजपला धक्के, तीन महिन्यांतच तीन मोठे नेते गमावले, ही पोकळी कशी भरणार?
मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप, गिरीश बापट
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 8:28 AM

पुणे : पुणे भारतीय जनता पक्षाला तीन महिन्यांपासून धक्क्यांवर धक्के बसत आहे. पुणे शहर व जिल्ह्यात भाजप घराघरापर्यंत नेण्यात महत्वाचा वाटा असणारे तीन नेत्यांची निधन झाले आहे. या तिघे नेत्यांनी पुणे जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देत भाजप रुजवले आणि पुणे शहर, पिंपरी चिंचवडमधून सत्ता मिळवली. कसब्याच्या आमदार मुक्‍ता टिळक यांचे २२ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाले. त्यानंतर पंधरा दिवसांच्या आत ३ जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार राहिलेले लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यानंतर आता पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी निधन झाले. यामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.

काँग्रेसची होती छाप

पुणे आणि पिंपरी चिंचवडचा राजकीय इतिहास पाहिला, तर काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संघटनात्मक आणि सत्तेच्या वर्चस्वाचा राहिले. याठिकाणी जनसंघ आणि नंतरचा भाजप यांचे अस्तित्वसुद्धा होते पण पुण्याच्या राजकीय संस्कृतीवर काँग्रेसीच छाप होती, ही वस्तुस्थिती आहे.

हे सुद्धा वाचा

मतदार संघाची केली बांधनी

चार दिवसांपूर्वी निधन झालेले गिरीश बापट यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाची अतिशय बारकाईने बांधणी केली होती. कसबा हा भाजपचा मतदार संघ म्हणूनच गेल्या तीन दशकात ओळखला जावू लागला होता. गिरीश बापट यांच्यानंतर कसबाची जबाबदारी मुक्ता टिळक यांनी सांभाळली. मुक्ता टिळक यांनी 2002 साली पहिली निवडणूक लढवली होती. 2002 पासून त्या राजकारणात सक्रिय होत्या. त्या आता आमदार झाल्या असल्या तरी महापालिका निवडणुकीमध्ये त्या सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला होता.

पिंपरी चिंचवडमध्ये जगताप यांची मक्तेदारी

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करणारे लक्ष्मण जगताप यांचे पिंपरी चिंचवडमध्ये चांगले वर्चस्व होते. 1986 साली ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले.त्यानंतर त्यांची राजकीय कारकिर्द उचावंत गेली. 2014 ची विधानसभा निवडणूक भाजपकडून त्यांनी लढली अन् विजयी झाले आणि त्यानंतरी 2019 मध्येही त्यांनी आमदारकीची निवडणूक जिंकली.

जून २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी पुण्यातील कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक व पिंपरी चिंचवडचे आमदार यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदान केले. यामुळे पक्षाशी असलेली त्यांची बांधिलकी किती उच्च पातळीची होती, हे समोर आले.

भाजपच्या नव्या नेतृत्वासमोर आव्हान

गिरीश बापट, मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचा निधनामुळे पक्षाला जनमानसापर्यंत नेणारे नेतृत्व भाजपने गमावले आहे. पुणे शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. ते मोडून त्यांनी भाजपची एकाधिकारशाही निर्माण केली. आता भाजपच्या नव्या दम्याच्या कार्यकर्त्यांना पुणेमधील शिवधनुष्य उचलावे लागणार आहे. भाजपला पुणे अन् पिंपरी चिंचवडमध्ये मजबूत नेतृत्व नव्याने उभे करावे लागणार आहे आणि हे काम सोपे नाही. गिरीश बापटांचे वय 73 होते. पण मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे वय जाण्याचे नव्हते. उलट ते दोघेही भाजपचे उभरते नेते होते. संघटनात्मक पातळीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरावर एक विशिष्ट प्रभाव निर्माण करण्याची त्यांच्यात क्षमता होती.

Girish Bapat : भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन…वाचा सविस्तर

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.