‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा…८०० कोटींची फसवणूक करणाऱ्या डीएसके यांना आठवली कुसुमाग्रजांची कविता

dsk builder pune | पुणे येथील डी.एस. कुलकर्णी हे प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायीक होते. पुणे शहरात त्यांनी अनेक मोठे प्रकल्प उभारले. मात्र, गुंतवणूकदार आणि बँकांची तब्बल ८०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती.

'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा…८०० कोटींची फसवणूक करणाऱ्या डीएसके यांना आठवली कुसुमाग्रजांची कविता
Pune Dsk
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 2:20 PM

योगेश बोरसे, पुणे | 2 नोव्हेंबर 2023 : पुणे येथील बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी म्हणजेच डीएसके एका फसवणूक प्रकरणात अडकले. ९ हजार गुंतवणूकदारांची ८०० कोटींमध्ये फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणे आणि जावयासह कंपनीतील लोकांना अटक झाली होती. डीएसके सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्याचवेळी ठेवीदारांनी त्यांचे पैसे मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. डीएसके यांची मालमत्ता विकून हे पैसे देण्याची मागणी न्यायालयात केली आहे. दरम्यान पुणे कोर्टात डीएसके बुधवारी आले होते. त्यावेळी त्यांना प्रतिक्रिया विचारली. तेव्हा त्यांना कुसुमाग्रजांची कविता आठवली. ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा…म्हणत त्यांनी भावना मांडल्या.

कवितेतून मांडल्या भावना

डी.एस.कुलकर्णी यांनी पुणे शहरात अनेक गृहप्रकल्प उभारले. त्यांनी कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले होते. त्यासाठी लोकांकडून आणि बँकांकडून पैसाही घेतला. परंतु हा पैसा त्यांना परत करता आला नाही. यामुळे गुंतवणूकदरांची ८०० कोटींमध्ये फसवणूक प्रकरणात त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती आणि कंपनीतील लोकांना अटकही झाली होती. त्यांची संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे देण्याची मागणी केली जात आहे. बुधवारी डीएसके कोर्टात आले होते.

यावेळी त्यांना प्रतिक्रिया विचारली. तेव्हा त्यांनी तात्यासाहेब शिरवाडकर यांची कणा कवितेतील दोन वाक्य म्हटली. ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा…पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा’ या कवितेच्या माध्यमातून डीएसके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डी. एस. कुलकर्णी कोर्टाच्या बाहेर जाताना माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी फार काही न बोलता कवितेच्या माध्यमातून भावना मांडल्या.

हे सुद्धा वाचा

मालमत्ता विकून पैसे मिळणार का?

डी. एस. कुलकर्णी यांच्या ३३५पेक्षा जास्त मालमत्ता पुणे शहर आणि परिसरात आहेत. या मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे देण्याची मागणी केली गेली आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांनी कोर्टात धाव घेतली आहे. डीएसके यांच्या असलेल्या ३३५ मालमत्तांपैकी ७१ मालमत्ता भागीदारी कंपन्यांच्या आहेत. यामुळे त्यांचा लिलाव करण्यास डीएसके यांचा विरोध आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.