पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटमध्ये गोळीबार; तरुण किरकोळ जखमी;छर्‍याच्या बंदुकीतून गोळीबार

ज्या तरुणांना दुसऱ्या तरुणावर गोळी झाडली आहे ते दोघेही एकमेकांना ओळखतात. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आला आहे असे सांगितले जात आहे. दरम्यान जखमी तरुणाला रुग्णलयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटमध्ये गोळीबार; तरुण किरकोळ जखमी;छर्‍याच्या बंदुकीतून गोळीबार
उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 10:46 PM

पुणे : पुण्यातील गजबजलेल्या परिसरात गोळीबार (Firing) केल्याची घटना घडल्याने या परिसरात खळबळ माजली आहे. कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट (Fashion Street) या भागात एका तरूणाने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, त्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले आहेत. गोळीबार झाल्यानंतर येथील एक तरुण किरकोळ जखमी (Boy Injured) झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुण्यात ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, एका तरुणाने दुसऱ्यावर पूर्व वैमनस्यातून छर्‍याच्या बंदुकीतून गोळी झाडली आहे.

पूर्ववैमनस्यातून गोळीबार

ज्या तरुणांना दुसऱ्या तरुणावर गोळी झाडली आहे ते दोघेही एकमेकांना ओळखतात. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आला आहे असे सांगितले जात आहे. दरम्यान जखमी तरुणाला रुग्णलयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दोघेही व्यावसायीक

या गोळीबारात जखमी असलेल्या तरुणाचे नाव तौफिक अख्तर शेख (वय ४५, रा. भीमपुरा, लष्कर) असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. जुल्फीफार शेख नावाच्या व्यक्ती विरुद्ध रात्री उशिरा लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौफिक शेख व जुल्फीकार शेख यांचे फॅशन स्ट्रीट परिसरात व्यवसाय आहेत.

छऱ्याची बंदुकीतून गोळीबार

मागील काही महिन्यांपासून तौफिक व जुल्फीकार यांच्यात वाद सुरू आहेत. त्यानंतर मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास तौफिक फॅशन स्ट्रीट परिसरातील एका दुकानाजवळ थांबले होते. त्यावेळी जुल्फीकार तेथे आला होता त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या छऱ्याच्या बंदुकीतून त्याने तौफिकवर गोळीबार केला.

व्यावसायिकांमध्ये भीती पसरली

गोळीबाराच्या या घटनेनंतर फॅशन स्ट्रीट परिसरातील नागरिक व व्यावसायिकांमध्ये भीती पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेतील संशयित आरोपी जुल्फीकारला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.