अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नीचा चाकूने भासकून खून; पत्नी ठार झाल्यानंतर पती फरार, पोलिसांचा शोध सुरु

अनैतिक संबंधाच्या कारणावरुन पती पत्नीचा वाद होऊन पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना चाकण येथे घडली. पुण्यातील चाकणच्या मेदनकरवाडीतील येथे ही घटना घडली आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नीचा चाकूने भासकून खून; पत्नी ठार झाल्यानंतर पती फरार, पोलिसांचा शोध सुरु
खून (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 3:07 PM

चाकणः अनैतिक संबंधाच्या कारणावरुन पती पत्नीचा वाद होऊन पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून (Murder) केल्याची घटना चाकण येथे घडली. पुण्यातील चाकणच्या मेदनकरवाडीतील (Medankarwadi) येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणात ठार झालेल्या महिलेचे नाव अश्विनी सचिन काळेत असे असून ती तेवीस वर्षाची होती. गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये (Wife-Husband) संशयावरुन सतत भांडणे होत होती. कालही या दोघांचे वाद झाले होते, त्यानंतर पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केला.पत्नाचा खून झाल्यानंतर पती सचिन काळते हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संशयावरुन अश्विनी आणि सचिन काळते यांचे वाद सुरु होते. नेहमी त्यांच्या या वादातून पत्नीला मारहाणही करण्यात येत होती. सोमवारी हा वाद विकोपाला जाऊन त्यातून खून झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरारी आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

वाद नेमका कशाचा

हा वाद नेमका पती पत्नीचाच आहे की, आणखी कोणता वाद आहे, चाचा तपासही पोलीस करत आहेत. पती सचिन काळते फरार झाला असून त्याला ताब्यात घेऊन पत्नीला नेमका का मारण्यात आले याचा शोध लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पती फरार

चाकण पोलिसात फरार असलेला सचिन काळते याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो कुठेही आढळून आला नाही. पत्नीचा खून करुन तो कुठे फरार झाला याचा शोध पोलीस घेत असून या प्रकरणाचा आणखी काही संबंध आहे का त्याचाही तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या

Sanjay Biyani Murder | संजय बियाणींच्या हत्येचा कट परभणीत? कुटुंबीयांना आलेल्या निनावी पत्राने खळबळ

Pune CCTV | मंदिर एकच, चोरी चौथ्यांदा, पुण्यात सिंहगड रोडवरील देवळात दानपेटी फोडली

Yavatmal Accident | आईवडिलांकडे बाळंतपणासाठी जात होती, खड्ड्यांनी घेतला बाळ-बाळंतिणीचा जीव

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.