Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : पुण्यातील वाहतूक कोडींला बायबाय, चांदणी चौक उड्डणपूल होणार खुला, कसा आहे पूल पाहा

chandni chowk bridge inauguration : पुणे शहरातील चांदणी चौक परिसर आता वाहतूक कोंडीतून मुक्त होणार आहे. शनिवारी चांदणी चौक पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर हा पूल वापरण्यासाठी खुला होणार आहे.

Pune News : पुण्यातील वाहतूक कोडींला बायबाय, चांदणी चौक उड्डणपूल होणार खुला, कसा आहे पूल पाहा
chandni chowk bridge inaugurationImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 7:38 AM

प्रदीप कापसे, पुणे | 12 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक परिसरात आजपासून ही समस्या संपणार आहे. पुण्यातील चांदणी चौक उड्डणपुलाचे लोकर्पण शनिवारी होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुलाचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. उद्घाटनाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ,पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर राहणार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

सुरक्षा पथककडून तपासणी

चांदणी चौक पुलाचे आज लोकार्पण होत असल्यामुळे डॉग पथक आणि बॉम्बशोध पथकाने परिसराची तपासणी केली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॉम्बशोधक पथकाकडून संपूर्ण परिसराची तपासणी केली गेली. व्हिआयपी नेते असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.

कसा आहे चांदणी चौक पूल

पुढील ५० वर्षांचा विचार करुन चांदणी चौक पुलाची उभारणी करण्यात आली आहे. दिवसाला दीड लाख वाहने या ठिकाणावरुन सुसाट धावू शकतील. १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहे.

  • मुंबईवरुन साताऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी दोन लेन आता तीन लेन
  • साताऱ्याकडून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी दोन लेन आता तीन लेन
  • मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने सेवा रस्ते
  • मुळशीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
  • बावधन, मुळशी आणि एनडीएकडून कोथरुडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
  • बावधनकडून येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतारामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती.
  • प्रकल्पासाठी ८६५ कोटी रुपये खर्च
  • ८३ हजार क्यूबिक मीटर क्राँक्रीटचा वापर
  • ५ हजार ७५० मेट्रिक टन स्टीलचा वापर
  • फेब्रुवारी २०१९ ते १२ ऑगस्ट २०२३ कालावधीत पुलाचे काम पूर्ण

वाहतुकीचे नवे नियम?

समृद्धी महामार्गावर होणाऱ्या भीषण अपघातांबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी बैठक घेणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. बैठकीत राज्यातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आढावा घेणार आहे. या बैठकीनंतर राज्यात अनेक नवे वाहतूक नियम लागण्याची शक्यता आहे.

दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.