अजितदादा आमच्यासोबत आलेत, आता पुरंदरच्या विमानतळाचा विषय मार्गी लावूच; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निर्धार व्यक्त

Pune Chandni Chowk Inauguration Today : पुरंदरमधील विमानतळासाठी केंद्राच्या सर्व परवानग्या मिळाल्यात, पण आता केवळ... पाहा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? अजित पवार यांचाही त्यांनी उल्लेख केला. तसंच पुण्याच्या वाहतूककोंडीवरही त्यांनी भाष्य केलं.

अजितदादा आमच्यासोबत आलेत, आता पुरंदरच्या विमानतळाचा विषय मार्गी लावूच; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निर्धार व्यक्त
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 1:37 PM

पुणे | 12 ऑगस्ट 2023 : पुरंदरमधीन नवीन विमानतळासाठी केंद्राच्या सर्व परवान्या राज्य सरकारला मिळाल्या आहेत. आता फक्त भूसंपादनाचा विषय बाकी आहेत. आता अजितदादा पवार आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे तिकडच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादनाचा विषय मिटवता येणार आहे. अजितदादा तो विषय मागे लावतील असा विश्वास आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही बैठक घेणार आहोत, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यासह पुण्यातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या बांधकामावर त्यांनी भाष्य केलं.

पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदचेच्या सभापती नीलम गोऱ्हे, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मंडळी उपस्थित आहेत. यावेळी पुण्याच्या विकासावर भाष्य करण्यात आलं.

अजितदादा पवार यांच्यासारखा पुण्यावर प्रेम करणारा नेता आमच्यासोबत आहे, त्यामुळे पुण्याच्या विकासाला गती मिळणार आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुण्यावर प्रेम आहे. आजपर्यंत कुठलेच पंतप्रधान पुण्यात आले नाहीत, तेवढ्यावेळा पंतप्रधान मोदी पुण्यात आले आहेत. यापुढेही ते येणार आहे. तसं नियोजन आम्ही केलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

पुण्यात 24 तास पाणीपुरवठा योजना लागू झाल्यावर पाणी गळती थांबणार आहे. कचऱ्यावर 100 टक्के प्रक्रिया करू, असं पुणेकरांनी ठरवलं पाहिजे. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि निटनेटकं ठेवणं. त्याचं सौंदर्य जपणं हे काम आपल्या सगळ्याचं आहे. त्यामुळे पुणेकर ही जबाबदारी पार पाडतील हा विश्वास आहे, असं फडणवीस म्हणाले.

वाहतूककोंडी कमी करायची असेल रिंग रोड आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट असण्याची गरज आहे. वाहतूककोंडी दूर करण्यासाठी डबल डेकर पूल तयार करण्याचा प्लॅन नितीन गडकरी यांनी तयार केलाय. वाहतूककोंडी मुक्त शहर करण्याचा आमचा प्रयन्त असणार आहे. कात्रज कोंढवा रोडच्या भूसंपादनासाठी 200 कोटी त्यांनी दिलेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

पुणेकरांना ट्राफिक जॅम मुळे दिवसा ढवळ्या चांदण्या पाहायला मिळत होतं. म्हणून या चौकाला चांदणी चौक असं नाव पडलं असं मला आधी वाटलं होतं! पुणे हे बुद्धिवंतांचे शहर म्हणून ओळखलं जातं.पुणे मेट्रोसाठी जे वन कार्ड तयार करणयात आलं आहे. ते कार्ड पीएमपीसाठी पण तयार करता येईल ते बघायला पाहिजे, देशात आता वन कार्ड प्रस्तावित आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.