AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांच्याकडे उरलेला पक्ष संपवण्यासाठी…; छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

Chhagan Bhujbal on Jitendra Awhad Statement About Ram : जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामांबद्दलच्या विधानावरून छगन भुजबळांनी डिवचलं. आगामी लोकसभा निवडणूक अन् जागावाटपावरही भुजळांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसी बैठकीतील चर्चित मुद्द्यांवर प्रतिक्रिय दिली. म्हणाले...

शरद पवार यांच्याकडे उरलेला पक्ष संपवण्यासाठी...; छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Jan 05, 2024 | 12:35 PM
Share

योगेश बोरसे, प्रतिनिधी -टीव्ही 9 मराठी, पुणे |05 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसोबत गेल्यापासून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना दिसतात. आताही त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला टोला लगावला आहे. निमित्त आहे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्याचं… प्रभूराम हे मांसाहारी असल्याचं वक्तव्य आव्हाडांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. ‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ ही म्हण आपण ऐकली आहे. पवार साहेबांचा जो उरला सुरला गट आहे. तो पक्ष संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही, असा टोला छगन भुजबळांनी लगावला आहे.

“पवारसाहेबांनी आशीर्वाद द्यावा”

शरद पवार यांनी आपल्यासोबत यावं असं आवाहन अजित पवार गटाकडून करण्यात येतं. भुजबळांनीही पुन्हा एकदा हे आवाहन केलं. अजितदादा पवारांनी सांगितलं आहे की, पवार साहेबांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा. तर ते बरोबरच आहे. शरद पवारसाहेबांनी आशीर्वाद दिले तर सोन्याहून पिवळंच आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे. यावर जितेंद्र छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलीय. आमचे 40 आमदार आहेत. जितकं त्यांना मिळतंय तितकंच आम्हाला मिळावं. कॅबिनेटमध्ये सगळी चर्चा होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर मी माझी भूमिका मांडली, असं भुजबळांनी म्हटलं आहे.

मराठा-ओबीसी आरक्षणावर भुजबळ म्हणाले…

सातत्याने कुणबी प्रमाणपत्र-दाखले चुकीची पद्धतीने सापडत आहेत. लिंगायत आणि इतर समाजाचे पण पाठवत आहेत. कुणाकुणाला दाखले देणार? आणि ओबीसीमध्ये आरक्षण देणार? हळू हळू मागण्या वाढत चालल्या आहेत. संपूर्ण मराठा यांना ओबीसी आरक्षण द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. नवनिर्मित नेत्यांच्या मागण्या वाढत चालल्या आहेत, असा टोला भुजबळांनी मनोज जरांगे यांना लगावला.

15 दिवसात सर्वेक्षण होऊ शकत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय जनगणना करा. कायमचा प्रश्न संपवा 54 टक्के ओबीसी आहेत त्यात 27 टक्के आम्हाला मिळालं आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. पण ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे, असं भुजबळांनी म्हटलं आहे.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.