PMC election 2022 : पुणेकर मतदारांनो, प्रारूप मतदार यादीवर सूचना अन् हरकतीसाठीची मुदत वाढवली; ‘ही’ बातमी वाचा…

पुणे महापालिकेकडे (Pune municipal corporation) आतापर्यंत मतदार यादीतील तफावतींबाबत नागरिकांकडून 968 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यात नावे गहाळ असल्याचा अनेकांचा आक्षेप आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मते, प्राथमिक तपासणीत प्रारूप मतदार यादीत त्रुटी असल्याचे दिसून आले आहे.

PMC election 2022 : पुणेकर मतदारांनो, प्रारूप मतदार यादीवर सूचना अन् हरकतीसाठीची मुदत वाढवली; 'ही' बातमी वाचा...
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 9:24 PM

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने (State election commission) प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीसाठी नागरिकांनी त्यांच्या सूचना आणि हरकती नोंदविण्याची मुदत 3 जुलैपर्यंत वाढवली आहे. याबाबतचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. यापूर्वी 1 जुलै ही अंतिम मुदत होती. राज्य निवडणूक आयोगाने 3 जुलैपर्यंत म्हणजेच रविवारपर्यंत अर्ज स्वीकारले जातील, असे सांगितले आहे. त्यासाठी महापालिकेने पुरेशी व्यवस्था करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. पुणे महापालिकेकडे (Pune municipal corporation) आतापर्यंत मतदार यादीतील तफावतींबाबत नागरिकांकडून 968 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यात नावे गहाळ असल्याचा अनेकांचा आक्षेप आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मते, प्राथमिक तपासणीत प्रारूप मतदार यादीत त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. राज्य निवडणूक आयोग आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी (PCMC) गुरूवारी प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली.

छाननीनंतर आठ दिवसांत बदल

लगतच्या वॉर्डांना नावे हलविण्यावर आक्षेप घेण्यात येणार असल्याचे राजकीय कार्यकर्ते महेश पोकळे यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, की अशी सर्व नावे त्यांच्या मूळ प्रभागात आहेत याची आम्ही खात्री करू. तर महापालिकेच्या निवडणूक शाखेचे प्रमुख यशवंत माने म्हणाले, की आम्ही मतदारांना विनंती करतो, की त्यांनी यादी तपासावी आणि काही हरकती असल्यास त्या मांडाव्यात. अर्जांची छाननी करण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रभाग कार्यालयात अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत आणि आक्षेपांत तथ्य आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष भेटीदेखील घेतल्या आहेत. छाननीनंतर आठ दिवसांत बदल सादर केले जातील.

हे सुद्धा वाचा

प्रभागनिहाय मतदार यादीची तपासणी

भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, की कार्यकर्त्यांनी प्रभागनिहाय मतदार यादीची तपासणी सुरू केली आहे. नावे गहाळ झाली आहेत किंवा हटवली गेली आहेत का ते आम्ही तपासत आहोत. भाजपाच्या शिष्टमंडळाने निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित बदल करण्याची विनंती केली, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता राहिलेल्या दोन दिवसांत महापालिकेला नागरिक मतदारांच्या तक्रारीचे निवारण करावे लागणार आहे.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.