पुणे शहरात सत्तासंघर्षावर बॅनरबाजी, पोस्टरमध्ये थेट सरन्यायाधीशांना उद्देशून लिहिले

पुणे शहरात सत्तासंघर्षावरील बॅनर लागले आहे. नेहमी बॅनरमुळे चर्चेत आलेले शहर आता या नवीन फ्लेक्समुळे पुन्हा चर्चेत आले आहे. आता चक्क सरन्यायाधीशांना उद्देशून फ्लेक्स लिहिले गेले आहे. काय आहे या फ्लेक्समध्ये अन् कोणासंदर्भात लिहिले आहे...

पुणे शहरात सत्तासंघर्षावर बॅनरबाजी, पोस्टरमध्ये थेट सरन्यायाधीशांना उद्देशून लिहिले
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 8:59 AM

पुणे : पुणे तेथे काय उणे असे नेहमी म्हटले जाते. नुकतेच पुणे शहरातील कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक (Pimpri Chinchwad byelection)झाली. कसबा पेठेत टिळक परिवाराला उमेदवारी दिली नाही, यावरुन बॅनर लागले होते. आमचं ही ठरलं धडा कसा शिकवायचा…या बॅनरची चर्चा संपूर्ण निवडणूक काळात चालली. पिंपरी चिंचवडमध्ये फ्लेक्सच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यांवर निशाणा साधला गेला होता. ही बंडखोरी खोके घेऊन झाल्याचं त्यात म्हटलंय होते. आता या बॅनरबाजीमुळे चर्चेत आलेले पुणे आता सत्तासंघर्षावरील बॅनरमुळे चर्चेत आले आहे. आता चक्क सरन्यायाधीशांना उद्देशन फ्लेक्स लिहिले गेले आहे.

सत्तासंघर्षाची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांचा खंडपीठाकडे सुरु होती. ही सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. न्यायालयाने निकाल राखून ठेवला. परंतु या प्रकरणात पुणे शहरात बॅनर लावण्यात आले आहे. त्यातून देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पुणेरी स्टाईलने विनंती राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून न्यायाधीशांना बॅनर मार्फत विनंती करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून लावलेल्या या बॅनरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लोकशाही वाचवण्यासाठी विनंती केली आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल न्यायाच्या बाजूने द्या, असे साकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सरन्यायाधीशांना घातले. सध्या शहरात हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

काय म्हटले आहे बॅनरमध्ये

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. आपण सर्व जाती धर्मातील लोक हे गर्वाने सांगतो. परंतु अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा केलेला गैरवापर आदी गोष्टींमुळे आपल्या देशात खरच लोकशाही उरली का? असा देशील प्रश्न पडतो. दिवसा ढवळ्या लोकशाही गाडून टाकण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या जनतेने उघड डोळ्यांनी पाहिले आहे. सत्ताधारी दडपशाहीने अधिकारांचा गैरवापर करुन हुकूमशाहीला पूरक असे वातावरण करत आहेत. अशा परिस्थितीत तमाम भारतातील जनता आपल्याकडे न्यायाची आस लावून बसली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा लढा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अंत्यत महत्वाचा आहे. आपण लोकशाही वाचवण्यासाठी योग्य तो निर्णय द्याल, याची खात्री आहे. अन्यथा भारतातील हुकूमशाहीची ही सुरुवात असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

बॅनरमधून संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसने लिहिलेल्या या बॅनरमधून सरळ सरळ निकाल कसा असा, यासंदर्भात संकेत दिले आहे. यामुळे हे बॅनर राजकीय असल्याची चर्चा सुरु आहे.

पुणे शहरात झळकले कुख्यात गुंडाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पोस्टर…वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.