पुणे चांदणी चौक पुलासंदर्भात महत्वाची बातमी? पूल कधी होणार सुरु?
pune chandni chowk bridge : पुणे येथील चांदणी चौकातील पूल कधी सुरु होणार? याची प्रतिक्षा पुणेकरांना लागली आहे. परंतु या पुलासाठी दिलेला उद्घाटनाचा मुहू्र्त टळणार आहे. पुलाचे अनेक काम अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आणखी काही कालावधी लागणार आहे.
योगेश बोरसे, पुणे : पुणे शहरातील चांदणी चौक (Chandani chowk) पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम सुरु आहे. हे काम अंतिम टप्याकडे आले आहे. नवीन पुलामुळे चांदणी चौकातून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. हा नवीन पूल कधी सुरु होणार याची प्रतिक्षा पुणेकर करत आहेत. या पुलामुळे पुणेकरांना आणखी एक वाहतुकीची चांगली सुविधा मिळणार आहे. सध्या चांदणी चौकातील पुलाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. १ मे पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही.
उद्घाटन पडणार लांबणीवर
चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन लांबणीवर पडणार आहे. पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन 1 मे रोजी होणार होते. परंतु पुलाचे काम पूर्ण न झाल्याने आणखीन दोन महिने उद्घाटनाला लागणार आहे. पुलाचे गर्डर बसवण्याचे काम अपूर्ण असल्याने पूल बांधण्यास आणखीन वेळ लागणार आहे.
ही तारखी ठरली होती
चांदणी चौकातील पुलाच्या उद्घघाटनासाठी १ मे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त ठरला होता. उद्घाटनास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. त्यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार होता. परंतु सध्या पुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. ९ गर्डरच्या माध्यमातून १५० मीटर लांबीचा आणि ३२ मीटर रुंदीचा उभारण्यात येतोय. त्य़ाला वेळ लागणार आहे. यामुळे १ मे चा उद्घाटनाचा मुहूर्त टळणार आहे.
पुलासाठी ३९७ कोटी खर्च
चांदणी चौकात ३९७ कोटी खर्च करुन १७ किलोमीटर लांबीचे विविध रस्ते तयार करण्यात आले आहेत. चांदणी चौकातून दुसरीकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडची कामे पूर्ण झाली आहेत. मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. याशिवाय बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे.
२ ऑक्टोंबर रोजी पाडला होता पूल
चांदणी चौकातील पूल २ ऑक्टोंबर २०२२ रोजी पाडला होता. अगदी सहा सेंकदात हा पूल पाडण्यात आला होता. पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात होते. मग 600 किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग वापर केला गेला होता. 1 हजार 350 डिटोनेटरचा उपयोगाने ब्लास्ट करण्यात आला. २ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान पूल पाडण्यात आला.
पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली होती. १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, 30 टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, 2 अग्निशमन वाहन, 3 रुग्णवाहिका, 2 पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण 210 कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले होते.