pune fire : मोठा अनर्थ टळला, अन्यथा ४०० सिलेंडरच्या स्फोटाने पुणे हादरले असते

pune fire : पुणे शहरात शुक्रवारी मध्यरात्री दोन मोठ्या आगीच्या घटना घडल्या. या आगीवर अग्नीशमन दलाच्या जवानांनी वेळीच यश मिळवले. अन्यथा ४०० सिलेंडरच्या स्फोटाने पुणे हादरले असते. आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

pune fire : मोठा अनर्थ टळला, अन्यथा ४०० सिलेंडरच्या स्फोटाने पुणे हादरले असते
Pune fire
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 10:08 AM

योगेश बोरसे, पुणे : पुणे शहरात मध्यरात्री आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या. पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच पिंपरी-चिंचवडमध्येही बँकेला आग लागली. या आगीत बँकेतील महत्वाची कागदपत्रे जळाली. परंतु अग्नीशमन दलाच्या जवानांमुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा पुणे शहर ४०० सिलेंडरच्या स्फोटाने हादरले असते. वाघोली येथील आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

वाघोलीत तीन जणांचा मृत्यू

पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग लागली. शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता उबाळे नगर येथे आग लागली. शुभ सजावट या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमध्ये असलेले ४ सिलेंडर फुटले. आगीनंतर त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश झाले. परंतु या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

Pune fire

अन्यथा ४०० सिलेंडरचा स्फोट

या भीषण आगीत दुर्देवाने तीन कामगारांचे मृतदेह आढळले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. परंतु अग्नीशमन दलाच्या जवानांनी चांगली कामगिरी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून आगीवर त्वरीत नियंत्रण मिळवले. शेजारी ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊन होते. त्या ठिकाणांपर्यंत आग जाऊ नये, यासाठी नियोजन केले. आगीवर वेळेतच नियंत्रण मिळवले. यामुले पुढील धोका टळला. अन्यथा ४०० सिलेंडरच्या स्फोटाने पुणे शहर हादरले असते.

काय म्हणाले अधिकारी

आगीसंदर्भात बोलताना पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आपत्कालीन परिस्थितीत जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी चांगले काम केले. जवळच 400 सिलिंडरचा साठा असलेले गोदाम होते. त्या ठिकाणी आग पसरू नये म्हणून खबरदारी घेतली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.”

पिंपरी चिंचवडमध्ये आग

पिंपरी चिंचवडमध्ये खराळवाडी परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदाला रात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये कागदपत्रे जळून खाक झाली असून दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.