पुणे शहरात सुरु आहेत अवैधरित्या ओला, उबेर रिक्षा? काय आहे हा प्रकार?

Pune Auto Services : पुणे शहरातील रिक्षांचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. पुणे परिवहन विभागाने ओला, उबेर रिक्षांचा परवाना नाकारला आहे. त्यानंतरही शहरात अवैधरितीने या रिक्षा सुरु आहेत. त्यावर अजून तोडगा निघाला नाही.

पुणे शहरात सुरु आहेत अवैधरित्या ओला, उबेर रिक्षा? काय आहे हा प्रकार?
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 11:53 AM

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ओला, उबेर रिक्षा अवैध ठरल्या आहेत. या रिक्षांना पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाची (आरटीओ) मान्यता नसतानाही या रिक्षा सुरु आहेत. पुणे शहरात काही ठिकाणी प्रिपेड रिक्षा सेवा सुरु झाली आहे. परंतु ती सर्वत्र नाही. यामुळे नागरिक पुन्हा ओलो, उबेर रिक्षा सेवेचा आधार घेत आहेत. पुणे व पिंपरी चिंचवडीमधील सुमारे 40,000 ते 45,000 हजार रिक्षांनी ओला, उबेर या कंपन्यांशी करार केला होता.

काय आहे प्रकरण

‘मोटार वाहन मार्गदर्शक सूचना- 2020’ नुसार ओलो, उबेरसह चार कंपन्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता केली नाही. त्यात मे. ॲनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे, मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि., मे. किव्होल्युशन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. पुणे आणि मे. रोपन ट्रान्सपोर्ट्रेशन सर्व्हिस प्रा.लि. पुणे यांचा समावेश आहे. यामुळे या चार कंपन्यांना पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने परवाना नाकारला आहे. यामुळे पुणे शहरात सुरु असलेल्या या कंपन्यांना जुळलेल्या सर्व रिक्षा अवैध ठरल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

का आहेत सुरु

‘मोटार वाहन मार्गदर्शक सूचना- 2020’ नुसार ओलो, उबेरसह चार कंपन्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता केली नाही. त्यात मे. ॲनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे, मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि., मे. किव्होल्युशन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. पुणे आणि मे. रोपन ट्रान्सपोर्ट्रेशन सर्व्हिस प्रा.लि. पुणे यांचा समावेश आहे. यामुळे या चार कंपन्यांना पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने परवाना नाकारला आहे. परंतु नागरिक या अवैध सेवेचा वापर करत आहे.

नागरिकांकडून का होतोय वापर

विभागीय परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी पुणे शहरात अवैधरित्या ओला, उबेर रिक्षा सुरु असल्याचे मान्य केले. या कंपन्यांचा परवाना फेटाळला आहे. त्यानंतरही त्यांनी पुन्हा परवान्यासाठी अर्ज दाखल केला नाही. यामुळे चिंता वाढली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दुसरीकडे सोयीस्कर असल्याने नागरिक ओला, उबेर सेवेचा वापर करत आहेत. ही सेवा वापरताना रिक्षाचालकांशी भांडण होत नाही. ठरलेले पैसे द्यावे लागतात, मोबाइलचा वापर करुन रिक्षा घरापर्यंत बोलवता येतात, यामुळे नागरिक त्याचा वापर करत आहेत.

80 टक्के व्यवसाय एग्रीगेटर सेवेतून

पुणे, पिंपरी चिंचवडमधली सुमारे 40,000 ते 45,000 रिक्षा ओला, उबेरला जुळल्या आहेत. त्यांचा 80 टक्के व्यवसाय या एग्रीगेटर सेवेतून येत आहे. ऑफलाइन बुकिंग फक्त 10 ते 20 टक्के असते. पुणे शहरातील तापमान वाढले आहे. यामुळे लोक ऑनलाइन बुकिंग सेवेचा उपयोग करतात. यामुळे ऑटो चालकांशी भांडण होत नाही. परिवहन विभागाकडून दुसरा पर्याय न दिल्यामुळे या अवैध ओला, उबेर रिक्षा सुरु आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.