पुणे शहरातील स्टार्टअपने बनवली स्मार्ट सिग्नल प्राणाली, वाहतूक कोंडीतून मिळाला दिलासा

Pune News : पुणे शहरात वाहनांची संख्या सर्वात जास्त आहे. यामुळे वाहतूक कोंडीही सतत होत असते. आता सिग्नलवर होणाऱ्या वाहतूक कोडींतून उपाय काढला गेला आहे. पुणे शहरातील स्टार्टअपने यासाठी स्मार्ट सिग्नल यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली आहे.

पुणे शहरातील स्टार्टअपने बनवली स्मार्ट सिग्नल प्राणाली, वाहतूक कोंडीतून मिळाला दिलासा
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 3:47 PM

रणजित जाधव, पिंपरी चिंचवड : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक म्हणजे मोठे दिव्यच असते. चार ते पाच किलोमीटर प्रवास करण्यासाठी अनेकदा तासभर वेळ जातो. चौकाचौकात असणारे सिग्नल आणि वाहनांची संख्या यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अनेकवेळी सिग्नलवर बराच वेळ थांबावे लागते. अगदी समोर काहीच वाहने नसताना दुसरीकडे लाल सिग्नल असतो. यामुळे एका बाजूची वाहतूक खोळबंली जाते. त्यावर पुणे शहरातील स्टार्टअपने उपाय काढला आहे. यासाठी स्मार्ट सिग्नल प्रणाली बनवली आहे.

काय आहे प्रणाली

पिंपरीकडून हिंजवडीकडे जायचं म्हणजे एक दिव्य याची प्रचिती नेहमीच येते. या भागात आयटी कंपन्यांची संख्या मोठी आहे. यामुळे या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीचा नेहमी सामना करावा लागतो. वाकडच्या मुख्य चौकात तर कितीतरी वेळा वाहतूक कोंडीचे चित्र दिसते. पण आता मात्र या चौकात सिग्नलच स्मार्ट झाले आहेत. या चौकात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट इंटेलिजंट सिग्नल सिस्टीम बसवण्यात आली आहे. ही सिस्टीम कॅमेरा आणि सर्वांनी नियंत्रित होते. ज्या लेनवर गाड्यांची संख्या अधिक आहे ते सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व्हरला कळवले जाते. त्यानंतर सर्व्हेर सिग्नलचा कालावधी त्यानुसार बदलतो आणि वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

ग्रीन कॅरोडोरची निर्मिती

स्मार्ट सिग्नल बनवताना रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांचा विचार करण्यात आला आहे. म्हणजे रुग्णावाहिका आली तर सिग्नल त्वरीत ग्रीन होतो, रुग्णवाहिका गेल्यावर पुन्हा त्याचे पूर्वीप्रमाणे काम सुरु होते. या स्मार्ट सिग्नल यंत्रणेमुळे या चौकात ७० टक्क्यांहून अधिक सकारात्मक परिणाम दिसत आहे.

रियल टाईममध्ये व्यवस्थापन

रियल टाईममध्ये सिग्नल व्यवस्थापन केलं जातं. जिथं ट्राफिक जास्त तिथं सिग्नल जास्त वेळ खुला असतो. यामुळे वाहतूक कोंडी कमी होते. ७० ते ८० टक्के वाहतूक कोंडी कमी झाली आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.