Pune News : पुणे शहराच्या पाणी प्रश्नाची चिंता सुटली का? कोणत्या धरणांमध्ये किती झाला जलसाठा

Pune News : पुणे जिल्ह्यात घाटमाथावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. पुणे शहरापेक्षा या ठिकाणी पाऊस चांगला झाला. या पावसामुळे पुणे शहराची पाणी पुरवठ्याची चिंता मिटली आहे का?

Pune News : पुणे शहराच्या पाणी प्रश्नाची चिंता सुटली का? कोणत्या धरणांमध्ये किती झाला जलसाठा
khadakwasla
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 12:22 PM

पुणे | 3 ऑगस्ट 2023 : राज्यात उशिराने आलेला मान्सून जुलै महिन्यात चांगलाच बरसला. या पावसामुळे कोकण आणि विदर्भातील काही ठिकाणी हाहा:कर उडाला होता. विदर्भात शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली होती. अनेक गावांना पुराने वेढले होते. पुणे शहरात मुसळधार पाऊस झाला नसला तरी पुणे परिसरातील घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे धरण खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर यांची पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. यामुळे पुणे शहराची पाणी पुरवठ्याची चिंता मिटली आहे.

खडकवासलाची काय आहे परिस्थिती

खडकवासला धरणात ९८ टक्के जलसाठा झाला आहे. पाणशेत धरणात ८५ टक्के जलसाठा झाला आहे. वरसगाव धरणात ७७ तर टेमघर धरणात ६० टक्के जलासाठा आहे. यामुळे पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याची चिंता आता राहणार नाही. पुणे शहरात पाणी कपातही आता होणार नाही.

निरा देधवर ९० टक्के भरले

पुण्याच्या भोर तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे निरा देवघर धरणं 90 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाच्या विदुयतगृहद्वारे 750 क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रामध्ये सोडले जात आहे. धरणातून पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पाठबंधारे विभागाकडून करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

पवना धरणात ९२ टक्के जलसाठा

पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळमधील पवना धरणाचा पाणीसाठा 92.72 टक्के झाला आहे. त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. वीज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी मध्ये 1400 क्यूसेस विसर्ग केला जात आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येत्या 24 ते 48 तासांमध्ये पवना धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाकडून आवाहन

धरणातून पाणी सोडले जाणार असल्यामुळे पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्रात कोणीही उतरू नये तसेच नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे तत्काळ हलविण्यात यावेत, अशा सूचना पवना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...