AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune CNG : पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! 1 नोव्हेंबरपासून पुण्यात सीएनजी नाही मिळणार?

पुण्यात सीएनजी पंपचालकांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका दैनंदिन कामकाजावर होण्याची दाट भीती! नेमका निर्णय काय?

Pune CNG : पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! 1 नोव्हेंबरपासून पुण्यात सीएनजी नाही मिळणार?
सीएनजी पंप Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 15, 2022 | 8:34 AM
Share

अभिजीत पोटे, TV9 मराठी, पुणे : पुण्यात 1 नोव्हेंबर पासून अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद (Pune CNG Pump on Strike) राहणार आहेत. पेट्रोल डिलर असोसिएशनच्या (Petrol Dealer Association) वतीने 1 नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. या संपाचा फटका पुणेकरांच्या थेट जगवण्यावर जाणवण्याची शक्यता आहे.  खरंतर येत्या 20 ऑक्टोबरपासूनच हा संप सुरु होणार होता. पण दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर हा संप 11 दिवसांनी पुढे ढकलण्यात आलाय. 1 नोव्हेंबर पासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आलाय.

विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जोपर्यंत जमा होत नाही, तोपर्यंत सीएनजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे संपामुळे पुणेकरांचे हाल होण्याची दाट भीती आहे. सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीचं काय होणार, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जातोय. दरम्यान, त्याआधीच या संपावर तोडगा काढण्याचीही गरज व्यक्त केली जातेय.

पाहा व्हिडीओ :

शुक्रवारी पुण्यात टोरंट सीएनजी संपाच्या मुद्द्यावर बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेश देशमुख, एचपीसी, आयओसी, बीपीसीएल आणि टोरेंट गॅसचे कार्यकारी संचालक तसंच पीडीए आणि जिल्हा पुरवठा अधिकाराही देखील हजर होते. या बैठकीत टोरंट सीएनजी पंप चालकांनी आपली मागणी लावून ठरली.

याआधी 1 ऑक्टोबर रोजी टोरंट सीएनजी पंप चालकांनी एक दिवसांचा लाक्षणिक बंद पुकारला होता. डीलर कमिशनमध्ये वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता.

1 ऑक्टोबर रोजी झालेल्या संपात 60 सीएनजी पंप चालक सहभागी झाले होते. या संपावेळी टोरंट सीएनजी पंप सोडले, तर इतर पेट्रोल पंप आणि एमएनजीएलकडून पुरवठा केला जाणारे सीएनजी पंप सुरु होते. त्यामुळे या बंदचा तितकाचा फटका पुणेकरांना जाणवला नव्हता. मात्र आता 1 नोव्हेंबर पासून पुकारण्यात आलेल्या संपाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच सीएनजी पंपचालकांच्या प्रलंबित मागण्या मान्य होतात, याकडेही पुणेकरांचं लक्ष लागलंय.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.