AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सायबर ठगांचा रडारवर पुणे जिल्हाधिकारी, दोन महिन्यात सहा वेळा टार्गेट

pune online fraud : पुणे शहरात फसवणुकीचे प्रकारात वारंवार वाढ होत आहे. शहरात सर्वसामान्यांची फसवणूक सायबर ठग करत असताना आता चक्क जिल्हाधिकारींची फसवणूक केली आहे. ही फसवणूक एका सायबर ठगाने केली आहे.

सायबर ठगांचा रडारवर पुणे जिल्हाधिकारी, दोन महिन्यात सहा वेळा टार्गेट
pune collector rajesh deshmukh
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 10:48 AM

अभिजित पोते, पुणे : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. डिजिटलच्या या युगात ठगसुद्धा डिजिटल झाले आहेत. सायबर ठग सर्वसामान्य लोकांना फसवण्यासाठी विविध प्रकार करत असतात. मग यासंदर्भात राज्यात सायबर पोलिसांकडे रोज तक्रारी येतात. या तक्रारींची संख्या शेकडोमध्ये आहे. या फसवणूक प्रकरणात उच्च शिक्षित लोकही आहेत अन् उच्चपदस्थ अधिकारी आहेत. आता पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना सायबर ठगांचा फटका बसला आहे. दोन महिन्यात तब्बल सहा वेळा त्यांना सायबर ठगांनी फटका दिला आहे.

काय केले सायबर ठगांनी

पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांचे आणखी एक बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यात सहाव्यांदा हा प्रकार होत आहे. यामुळे सायबर चोरट्यांच्या रडावर पुन्हा एकदा पुण्याचे जिल्हाधिकारी आले आहेत. सायबर ठगांनी राजेश देशमुख यांचे फोटो वापरत तसेच आयएएस असे लिहीत बनावट फेसबुक अकाउंट तयार केले आहे.

काय झाली कारवाई

पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असलेल्या डॉक्टर राजेश देशमुख यांच्याबाबत दोन महिन्यांत सहाव्यांदा हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी त्यांनी अनेकदा सायबर पोलिसात तक्रार सुद्धा केली आहे. परंतु अजूनपर्यंत एकावरही कारवाई झाली नाही. चक्क जिल्हाधिकारींचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले जात असतानाही आतापर्यंत कोणावर कारवाई झाली नाही. यामुळे सामान्य व्यक्तींच्या प्रकरणांचा तपास कसा लागणार? हा प्रश्न आहे.

हे सुद्धा वाचा

वारंवार खाते करुन रिक्वेस्ट

दोन महिन्यात पाच ते सहा वेळा डॉक्टर राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट खाते तयार करून सायबर चोरटे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहेत. त्यांनी यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रारसुद्धा दिली आहे. तसेच कुठल्याही बनावट अकाउंटला बळी पडू नका, असे आवाहन केले आहे.

का केले जाते टार्गेट अधिकाऱ्यांना

सायबर ठग मोठ-मोठ्या अधिकारी अन् लोकांची नावे वापरतात. या माध्यमातून आपण कोणीतरी मोठे व्यक्ती असल्याचे अभासी दुनियेत दाखवण्याचा प्रयत्न करतात. मग या माध्यमातून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियाचा वापर करुन आपण मोठे अधिकारी किंवा सेलिब्रेटी असल्याची बतावणी करुन फसवणूक करण्याचा हा प्रकार असतो.

प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....