सायबर चोरट्यांच्या रडारवर पुण्याचे जिल्हाधिकारी? आता पुन्हा काय केले सायबर ठगांनी…

pune online fraud : पुणे शहरात फसवणुकीचे विविध प्रकार सुरु आहेत. सर्वसामान्यांची फसवणूक केल्याचे अनेक प्रकार रोज उघड होत आहेत. परंतु आता चक्क जिल्हाधिकारींची फसवणूक केली आहे. ही फसवणूक एका सायबर ठगाने केली आहे.

सायबर चोरट्यांच्या रडारवर पुण्याचे जिल्हाधिकारी? आता पुन्हा काय केले सायबर ठगांनी...
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 10:11 AM

पुणे : डिजिटलच्या युगात चोरटे डिजिटल झाले आहेत. सर्वसामान्य लोकांना रोज फसवले जात आहेत. राज्यात सायबर पोलिसांकडे रोज शेकडो फसवणुकीच्या तक्रारी येत आहेत. यामध्ये उच्च शिक्षितांची फसवणूक होत आहे. सायबर चोरटे फसवणुकीचे नवनवीन प्रकार शोधत आहेत. आता पुणे (pune crime news) जिल्हाधिकारींनाच सायबर ठगांचा फटका बसला आहे. पुणे जिल्हाधिकरींचे फेसबुकबर बनावट अकाऊंट तयार करण्यात आले आहे.

नाव अन् फोटोचा वापर

सायबर चोरट्यांच्या रडारवर पुण्याचे जिल्हाधिकारी आले आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्याचे सत्र सुरूच आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे फोटो वापरत मागील महिन्यात “माही वर्मा” या नावाने फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते. यावेळी पुन्हा एकदा देशमुख यांचे नाव आणि फोटो वापरून बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वी ४ ते ५ वेळेला त्यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते आणि त्यांच्या मित्र परिवारातील अनेक जणांना “रिक्वेस्ट” सुद्धा पाठवण्यात आल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी माहीने केले होते अकाउंट

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट माही वर्माने तयार केले. त्यात डॉ.देशमुख यांचा फोटो वापरला. आपण आयएएस अधिकारी असल्याचे त्यात म्हटले आहे. आपण मुंबईत राहत असल्याचे त्यात म्हटले आहे. फेसबुक बनावट अकाउंटचा फटका आता थेट पुणे जिल्हाधिकारींना बसला आहे.

पोलिसांमध्ये तक्रार

फेसबुकवर माझ्या नावाने तयार करण्यात आलेले अकाउंट माझे नसून कुठल्या ही प्रकारच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, असे आवाहन स्वतः देशमुख यांनी केलं आहे. तसेच या संदर्भात राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसांना माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे नाव वापरून याआधी तीन वेळा काही अज्ञातानी फेसबुक अकाऊंट तयार केले होते. आता पुन्हा तिसऱ्यांदा केले आहे.

का केले जाते अधिकाऱ्यांना टार्गेट

सायबर ठग मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांची नावे अन् फोटो वापरुन लोकांना फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. सायबर मीडियाचा वापर करुन आपण मोठे अधिकारी असल्याची बतावणी करुन लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यामुळे मोठ्या लोकांचे नाव अन् फोटोंचा वापर ते करतात.

हे ही वाचा

cyber fraud : सावध व्हा, सायबर चोरट्यांनी यांना घातला १६ कोटींचा गंडा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.