Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Ganeshotsav : पुण्यातल्या गणेश मंडळांना पाच वर्षाचा परवाना देणार, पण..; काय म्हणाले आयुक्त विक्रम कुमार?

कोरोनामुळे मागील दोन वर्ष कोणतेही उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरे झाले नाहीत. अनेक मर्यादा होत्या. यंदा मात्र सर्वच सण, उत्सव सार्वजनिक आणि कमी निर्बंधांत साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Pune Ganeshotsav : पुण्यातल्या गणेश मंडळांना पाच वर्षाचा परवाना देणार, पण..; काय म्हणाले आयुक्त विक्रम कुमार?
महापालिका आयुक्त विक्रम कुमारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 4:43 PM

पुणे : पुण्यातील गणेश मंडळांसाठी (Pune Ganeshotsav) एक आनंदाची बातमी आहे. गणोशोत्सवासाठी दरवर्षी मांडव घालण्याची परवानगी घेण्याऐवजी पाच वर्षाचा हा परवाना मिळू शकणार आहे. याबद्दल खुद्द आयुक्त विक्रम कुमार (Commissioner Vikram Kumar) यांनीच माहिती आणि सकारात्मकता दर्शवली आहे. मात्र यासाठी पोलिसांशीही चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरवर्षी पुण्यातील गणेश मंडळांना महापालिका त्याचप्रमाणे पोलिसांची (Pune Police) परवानगी घ्यावी लागते. ही अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया असल्याचे मंडळांचे म्हणणे आहे. या दोघांची परवानगी, वारंवारच्या बैठकास कागदपत्रे अशी सर्व ही प्रक्रिया असून गणेश मंडळांसाठी ही प्रक्रिया वेळ जाणारी आणि किचकट वाटते. याविषयी अनेक बैठका, चर्चादेखील झाल्या, मात्र कायमस्वरुपी तोडगा अद्याप निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त विक्रम कुमार यांनी या गणेश मंडळांसाठी ही पाच वर्षाच्या परवानगीची तयारी दर्शवली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या अखेर गणेशोत्सवाला सुरुवात

कोरोनामुळे मागील दोन वर्ष कोणतेही उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरे झाले नाहीत. अनेक मर्यादा होत्या. यंदा मात्र सर्वच सण, उत्सव सार्वजनिक आणि कमी निर्बंधांत साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकतीच गणेश मंडळांसाठी पोलिसांनी नियमावलीही जारी केली. त्यामुळे धडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या सार्वजनिक मंडळांनीदेखील कंबर कसली. ऑगस्ट महिन्याच्या अखेर गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे मोठ्या मंडळांची मांडव, देखावे अशी तयारीची गडबड सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

विविध यंत्रणांवर आधीच ताण

दरवर्षी मंडळांना परवानगी घ्यावी लागते. त्यात ना हरकत प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची जुळवाजुळव करताना कार्यकर्त्यांची दमछाक होते. त्यात पोलीस आणि महापालिकेच्या विविध यंत्रणांवर आधीच ताण असतो. त्यात उत्सवकाळातला अधिकचा बोजा यामुळे गणेश मंडळांनाही परवानगीसाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्या पार्श्वभूमीवर 2020मध्ये दिलेल्या परवानगीनुसार, पुढील पाच वर्षे परवानगी द्यावी, अशी मागणी सार्वजनिक गणेश मंडळांनी केली. त्यावर आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, की गणेश मंडळांना पाच वर्षांसाठी परवानगी देण्यास महापालिकेला अडचण नाही, मात्र पोलिसांनी त्यासाठी तयारी दर्शवावी. त्यानंतरच याची अंमलबजावणी शक्य आहे.

मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....