मोठी बातमी: पुण्यात व्हेंटिलेटर्स बेड संपले, ऑक्सिजन बेडसचाही तुटवडा, आता कोव्हिड सेंटरही ‘हाऊसफुल्ल’

गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असतानाही या कोव्हिड सेंटरमध्ये 300 ते 400 रुग्ण होते. मात्र, आता हे कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे. | jumbo covid centre Pune

मोठी बातमी: पुण्यात व्हेंटिलेटर्स बेड संपले, ऑक्सिजन बेडसचाही तुटवडा, आता कोव्हिड सेंटरही 'हाऊसफुल्ल'
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 8:58 AM

पुणे: राज्यातील कोरोनाच्या मुख्य हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे. या संकटात आता आणखीनच भर पडली आहे. कारण, सामान्य लोकांना कोरोना उपचार घ्यायचे झाल्यास आशेचे केंद्र असलेले जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरल्याची माहिती समोर आली आहे. (Jumbo Covid centre in Maharashtra get full in 12 days)

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे. अवघ्या 12 दिवसांमध्ये हे सेंटर भरले आहे. सध्याच्या घडीला या कोव्हिड सेंटरमध्ये 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असतानाही या कोव्हिड सेंटरमध्ये 300 ते 400 रुग्ण होते. मात्र, आता हे कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास रुग्णांवर उपचार कसे करायचे, हा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

पुणेकरांनो सावध राहा; एकही व्हेंटिलेटर बेड उरला नाही

पुण्यात सध्याच्या घडीला रुग्णाला व्हेंटिलेटवर ठेवायचे झाल्यास एकही बेड शिल्लक नाही. तर कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ऑक्सिजन बेडसची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण पुणे जिल्ह्यात केवळ 376 ऑक्सिजन बेडस उरले आहेत. व्हेंटिलेटर्स बेडससाठी रुग्ण अक्षरश: वेटिंग लिस्टमध्ये आहेत. एखादा बेड खाली झालाच तर तात्काळ तो भरला जातो. राज्याच्या इतर भागातूनही पुण्यात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा प्रकोप असाच वाढत राहिल्यास काय करायचे, असा प्रश्न प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

पुण्यातील व्यापारी म्हणतात आम्ही दुकानं उघडणार

राज्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना निर्बंधांमुळे आक्रमक झालेल्या व्यापारी वर्गाने पुण्यातील दुकाने उघडण्याचा चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे (Pune Coronavirus) आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील दुकाने उघडल्यास कारवाई करण्याचा इशारा व्यापाऱ्यांना दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात अनेक ठिकाणी व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे. पुण्यातील व्यापारीही त्याला अपवाद नाहीत. पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाविरोधात शहरातील व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज आपली दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडण्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यास राज्य शासनाच्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला. तसेच शहरात घातलेल्या निर्बंधांची अधिक कडक अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेकडून पोलिसांना आणखी काही अधिकार दिले जाणार असल्याचेही आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या:

कुठे लस उपलब्ध नाही तर कुठे रेमडेसिव्हीरच गायब, राजकारण मात्र जोरात, वाचा कुठल्या शहरात कशाचा दुष्काळ?

पुण्यात कोरोनाचा कहर, रुग्णांसाठी बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि लसीची आकडेवारी काय? वाचा आयुक्तांची माहिती

कोरोना झालाय, पण घरीच राहून उपचार घ्यायचेत , मग 25 हजाराच्या बाँडवर सही करा

(Jumbo Covid centre in Maharashtra get full in 12 days)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.