Pune Lockdown Update | पुण्यात अंशतः लॉकडाऊन, भयावह स्थिती दाखवणारी आकडेवारी

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून पुढील आठवड्यापर्यंत भयावह परिस्थिती कायम राहण्याची चिन्हं आहेत. (Pune Corona Partial Lockdown Bed Patients)

Pune Lockdown Update | पुण्यात अंशतः लॉकडाऊन, भयावह स्थिती दाखवणारी आकडेवारी
विभागीय आयुक्त सौरभ राव
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 2:18 PM

पुणे : पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट (Pune Corona lockdown update) होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानुसार उद्यापासून पुढील सात दिवस बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. (Pune Corona Ajit Pawar announces Partial Lockdown Pune Corona Hospital Bed Patients Update)

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून पुढील आठवड्यापर्यंत भयावह परिस्थिती कायम राहण्याची चिन्हं आहेत. पुण्यात पुन्हा एकदा बेडची कमतरता जाणवणार असून जिल्ह्यात मृत्यूदरही वाढण्याची शक्यता आहे.

2 एप्रिल 2022

पुणे जिल्ह्याची बेड स्थिती

एकूण बेड्सची स्थिती

– ऑक्सिजन बेड्स – 9118 – ऑक्सिजन विरहीत बेड्स – 41093 – आयसीयु बेड्स – 2927 – व्हेंटिलेटर्स बेड – 996

उपचार बेडची स्थिती

ऑक्सिजन बेडवर उपचार संख्या – 2974 ऑक्सिजन विरहीत बेडवर उपचार संख्या – 11563 आयसीयु बेडवर उपचार संख्या – 1073 व्हेंटिलेटर्स बेडवर उपचार संख्या – 376

शिल्लक बेडची स्थिती

– ऑक्सिजन बेड्स – 6144 – ऑक्सिजन विरहीत बेड्स – 29530 – आयसीयु बेड्स – 1854 – व्हेंटिलेटर्स बेड – 620

रुग्ण संख्येची स्थिती

– ऍक्टिव्ह रुग्ण – 61740 – रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या – 15986 ( यामधील गंभीर रुग्ण 4423 ) – घरी उपचार घेणारे रुग्ण – 45754

12 एप्रिलपर्यंतचा प्रशासकीय अनुमान

– ऑक्सिजन विरहित फक्त 9 बेड्स शिल्लक राहतील – 3207 ऑक्सिजन बेडची कमतरता भासेल – 462 आयसीयु बेड शिल्लक राहतील – 647 व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल

जिल्ह्याचा मृत्यूदर

– पुणे मनपा – 2 टक्के – पिंपरी चिंचवड – 1.4 टक्के – पुणे देहू व खडकी कॉनटोन्मेंट बोर्ड – 2.3 टक्के – पुणे ग्रामीण – 1.9 टक्के – पुणे जिल्ह्याचा एकूण मृत्यू दर – 1.8

(Pune Corona Ajit Pawar announces Partial Lockdown Pune Corona Hospital Bed Patients Update)

पुण्यात काय सुरु काय बंद?

  • सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील, मात्र पार्सल सेवा सुरु राहील.
  • मॉल आणि सिनेमा हॉल 7 दिवसांसाठी बंद
  • धार्मिक स्थळं 7 दिवसांसाठी बंद
  • PMPML बससेवा 7 दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु
  • आठवडे बाजारही बंद
  • लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत
  • संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
  • दिवसभर जमावबंदी
  • जिम सुरु राहणार
  • दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार
  • शाळा महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या 

राज्यात अंशत: लॉकडाऊन शक्य, ठाकरे सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांचा इशारा, नियमही सांगितले!   

बचेंगे तो और भी लढेंगे, मुंबईच्या महापौरांनी मूठ आवळली, लॉकडाऊन की निर्बंध लवकरच घोषणा

(Pune Corona Ajit Pawar announces Partial Lockdown Pune Corona Hospital Bed Patients Update)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.