Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune corona update | पुण्यात कोरोनाचा स्फोट ! मृतांचा आकडा चिंता वाढवणारा; तब्बल अडीच हजार नव्या रुग्णांची नोंद

पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा लवकरच 5 हजारांचा आकडा पार करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. (pune corona daily update)

Pune corona update | पुण्यात कोरोनाचा स्फोट ! मृतांचा आकडा चिंता वाढवणारा; तब्बल अडीच हजार नव्या रुग्णांची नोंद
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 9:33 PM

पुणे : राज्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. जवळजवळ संपूर्ण जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबादसारख्या जिल्ह्यांत तर कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. यामध्ये पुणे शहराची स्थिती तर अतिशय गंभीर असल्याचं म्हटंल जात आहे. पुण्यात आजसुद्धा (Pune Corona daily update) दोन हजारांच्या पुढे नवे कोरोनाग्रस्त नोंदवले गेले आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडासुद्धा लवकरच 5 हजारांचा आकडा पार करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.(Pune Corona daily update detail information of Pune district)

पुण्यात सध्या कोरोनाग्रस्तांची स्थिती काय?

पुण्यात कोरोग्रस्तांचा आलेख दररोज वाढतच आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभरात 2587 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यातील 573 रुग्णांचे अहवाल मागील काही दिवसांपूसन प्रलंबित होते. नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण याकडे पाहिले, तर पुण्यात कोरोना महामारीची स्थिती चिंताजनक असल्याचं दिसतं. पुण्यात दररोज अडीच हजारांच्या पुढे नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 1 हजारांपेक्षांही कमी आहे. आज पुण्यात दिवसभरात 2587 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर दिवसभरात फक्त 769 जण कोरोनातून मुक्त झाले.

मृतांचा आकडा 5 हजारांच्या उंबरठ्यावर

पुण्यात कोरोनाचा प्रसार जेवढ्या वेगात वाढतोय; तेवढ्याच प्रमाणात मृतांचा आकडासुद्धा वाढताना दिसतोय. पुण्यात आज (17 मार्च) दिवसभरात 16 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यातील 5 रुग्ण हे पुण्याच्या बाहेरचे आहेत. मृतांचे प्रमाण असेच राहिले, तर आगामी एक किंवा दोन दिवसांत पुण्यातील मृतांचा आकडा 5000 ची संख्या पार करेल, असे दिसतेय. पुण्यात सध्या 425 बांधितांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 223797 वर पोहोचला असून सध्या पुण्यात 15032 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे येथील प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पुणे आरोग्य विभागाकडून कोरोनाला थोपवण्यासाठी कठोर निर्णय घेतले जात आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसोबतच विलगीरणावर प्रशासनाकडून जोर देण्यात येतोय. सध्या पुणे प्रशासनाने शहर तसेच जिल्ह्यात वेगवेगळे प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत.

इतर बातम्या :

सोन्याच्या किमती 45000 रुपयांहून कमी; पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव?

धक्कादायक! वहिनीला परपुरुषाबरोबर रंगेहाथ पकडलं, नंतर दिरानं जे काही केलं त्यानं सगळेच हादरले

PHOTO | ‘न्यूड’ फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या वनिता खरातचे ‘हे’ नवे बोल्ड फोटो पाहिलेत का?

(Pune Corona daily update detail information of Pune district)

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.