Pune Corona | पुण्यात 80 टक्के रुग्णांनी दोन्ही डोस घेतले, तरी कोरोनाची लागण; आणखी कठोर निर्बंध लागणार
विशेष म्हणजे पुण्यात नव्या कोरोनाग्रस्तापैकी 80 टक्के रुग्णांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोन्ही डोस घेऊनही कोरोनाची लागण होत असल्यामुळे नागरिकांनी आणखी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. तसेच ओमिक्रॉनचाही संसर्ग वाढताना दिसतोय. दरम्यानस पुणे जिल्ह्याची परिस्थितीदेखील चिंताजनक अशी आहे. पुण्यात मागील पाच ते सहा दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. विशेष म्हणजे पुण्यात नव्या कोरोनाग्रस्तापैकी 80 टक्के रुग्णांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोन्ही डोस घेऊनही कोरोनाची लागण होत असल्यामुळे नागरिकांनी आणखी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
जवळापास 80 टक्के रुग्णांनी घेतले दोन्ही डोस
मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामध्ये नव्या कोरोनाबाधिकांपैकी जवळपास 80 टक्के रुग्णांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. म्हणजेच लसीच्या दोन्ही मात्रा घेऊनही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण बरेच आहे. यामुळे लसीच्या प्रभाव क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. तसेच लस घेतली असली तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम म्हणजेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तसेच सॅनिटायझरचा वापर करणे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निर्बंध आणखी वाढण्याची शक्यता
पुण्यात मागील 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या पाच ते सहा दिवसात रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठ दिवसात पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या चौपट झाल्याचं समजतंय. पुण्यात तीन जानेवारी रोजी 444 नव्या रुग्णांची नोंद झालीय. तर 2838 बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. येथे तीन जानेवारी रोजी 120 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे रुग्ण वाढत असल्यामुळे आगामी काळात पुण्यात आणखी कडक नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत.
इतर बातम्या :