Pune Corona Update : हॉटेल रात्री 11 वाजेपर्यंत सुरु होणार, नाट्यगृहसुद्धा उघडणार, अजित पवारांकडून पुण्याला मोकळं करण्याचा प्लॅन जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिलीय. सोमवारपासून पुण्यातील हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

Pune Corona Update : हॉटेल रात्री 11 वाजेपर्यंत सुरु होणार, नाट्यगृहसुद्धा उघडणार, अजित पवारांकडून पुण्याला मोकळं करण्याचा प्लॅन जाहीर
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 4:48 PM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिलीय. सोमवारपासून पुण्यातील हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय. (Review meeting on Corona situation in Pune, Pimpri-Chinchwad in presence of Ajit Pawar)

कोणकोणते महत्वाचे निर्णय?

सोमवारपासून पुण्यातील हॉटेल्स रात्री 11 पर्यंत सुरु राहणार पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पर्यटन स्थळे सुरु करणार महाविद्यालये लवकरच सुरु करण्याचा विचार पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी पर्यत्न मिशन कवच अभियान उत्स्फुर्तपणे राबवणार पुणे, पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालये सोमवारपासून सुरु होणार, विद्यार्थ्याांचं लसीकरण बंधनकारक

अजित पवार काय म्हणाले?

दर आठवड्याच्या प्रथेप्रमाणे आज बैठक पार पडली. सोमवारपासून खासगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहोत. सोमवारपासून महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी देण्यात आलीय. तर 22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह सुरु करणार आहोत. तसंच सोमवारपासून राज्य आणि केंद्र सरकारशी संबंधित ट्रेनिंग सेंटर सुरु करणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

राज्यात पुणे जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. झोपडपट्टी परिसरात लसीकरण वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. झोपडपट्टी परिसरात लसीकरण कमी होत आहे. पुण्यात कोरोना दर 2.5 टक्के आहेत. तर कोरोना बाधितांचा दर 3 टक्के आहे. तर पुण्यात पहिल्या डोस घेणाऱ्यांचं प्रमाण 103 टक्के आहे. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरण वाढवण्याची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले.

पुण्यात अजितदादांच्या समर्थनात कार्यकर्ते रस्त्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे. या प्रकरणी अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यानंतर आता पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी काऊन्सिल हॉलसमोर मानवी साखळी तयार केली.

या आंदोलनात अनेक महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. अजित पवार यांच्या समर्थनात आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, अंकुश काकडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते विधान भवनासमोर आक्रमक झाले आहेत. त्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी अजित पवार यांना काऊन्सिल हॉलबाहेर यावं लागलं. त्यावेळी अजित पवारांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.

इतर बातम्या :

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन; सासरा म्हणतो जावयानं दारुच्या नशेत फोन केला!

Photo : दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी, दादांनी थेट सॅल्यूटच ठोकला!

Review meeting on Corona situation in Pune, Pimpri-Chinchwad in presence of Ajit Pawar

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.