पुणेकरांसाठी गुड न्यूज, आज एकही कोरोना मृत्यू नाही, 8 महिन्यानंतर पहिल्यांदाचा सुटका

पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्युची नोंद झालेली नाही. पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे.

पुणेकरांसाठी गुड न्यूज, आज एकही कोरोना मृत्यू नाही, 8 महिन्यानंतर पहिल्यांदाचा सुटका
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 6:55 PM

पुणे: पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्युची नोंद झालेली नाही. पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.6 फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमचं पुण्यात कोरोनामुळं एकही मृत्यू झालेला नाही. पुण्याच्या महापौरांनी यासंदर्भात ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे.

पुणेकरांना दिलासा

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पुण्याला देखील बसला होता. पुण्यामध्ये कोरोना आणि म्युकर मायकोसिसच्या रुग्णांच्या मृत्यूंची संख्या वाढली होती. पुण्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे तब्बल आठ महिन्यानंतर रुग्णांच्या मृत्यूची संख्या शुन्यावर आली आहे. पुण्याला 6 फेब्रुवारी 2021 नंतर दिलासा मिळाला आहे.

पुणे कोरोना रिपोर्ट

पुण्यात आज  दिवसभरात 112 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर, पुण्यात आज दिवसभरात 118 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातही कोरोनाच्या मृत्यूची संख्या शुन्यावर आली आहे.  पुण्यात सध्या 151 गंभीर कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 5 लाख 3 हजार 469 पर्यंत पोहोचली आहे.   पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 988 वर पोहोचली आहे.  पुण्यातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या 9067 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 493414 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आज 5986 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.

पुण्यात ‘लसीकरण आपल्या दारी’ अभिनव उपक्रम

पुणे शहरात 108 टक्के लसीकरण झाल्याची माहिती नुकतीच पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. यामध्ये अनेक लोकांकडे आधार कार्ड नसतात. ओळख पत्र नसते, अशा अनेक अडचणी येतात. परंतु लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम पुण्यातील बेघर वंचित लोकांसाठी आशादायी ठरत आहे.

इतर बातम्या:

Pune College Reopen : विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांची अनास्था, पुण्यातील महाविद्यालयांमध्ये अल्प उपस्थिती

पुण्यातील ज्येष्ठांची लसीकरणात आघाडी, 64 टक्के नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस

Pune Corona Update not single corona death record in Pune today Mayor Murlidhar Mohol tweet and gave information

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.