Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता, खासगी रुग्णालयांकडून बेड राखीव ठेवण्यास नकार

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे महापालिकेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. (Pune Corona Update)

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता, खासगी रुग्णालयांकडून बेड राखीव ठेवण्यास नकार
पुणे महानगरपालिका आणि कोरोना विषाणू
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 12:13 PM

पुणे : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे महापालिकेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पुणे महापालिकेतील 5 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तर दुसरीकडे पुण्यातील खाजगी रुग्णालयाने नॉन कोव्हिड बेड कोरोना रुग्णांसाठी देण्यास नकार दिला आहे. (Pune Corona Update  private hospital refuse to reserve beds)

पुणे महापालिकेत कोरोनाचा शिरकाव

पुणे महापालिकेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पुणे महापालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याशिवाय महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यालाही दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. पुण्यात कोरोना सर्वेक्षण करत असताना हा संसर्ग झाला असल्याचे बोललं जात आहे. पुणे महापालिकेत आतापर्यत तब्बल 669 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

खाजगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णांना बेड देण्यास नकार 

एकीकडे पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे पुण्यातील खाजगी रुग्णालयाने नॉन कोव्हिड बेड कोरोना रुग्णांसाठी देण्यास नकार दिला आहे. पुणे महापालिका प्रशासनाची खासगी रुग्णालय चालकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान खाजगी रुग्णालयातील 50 टक्के बेड हे राखीव ठेवावेत असे आदेश दिले आहेत. मात्र रुग्णालयांनी या आदेशांना नकार दिला आहे.

मात्र दोन दिवसात बेडची व्यवस्था करा, अन्यथा सक्तीने ताब्यात घेऊ, अशी तंबी महापालिकेने दिली आहे. जर 50 टक्के बेड दिले नाहीत. तर 80 टक्के बेड राखीव ठेवण्याचे धोरण आखावं लागेल, असा इशाराही पालिकेने दिला आहे. पुणे  शहरातील शासकीय हॉस्पिटलमधील बेड फुल्ल झाल्यानं महापालिका अॅक्शन मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसात पुणे शहरातील खाजगी हॉस्पिटलमधील 50 टक्के बेड पालिका ताब्यात घेणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक 

राज्यात काल दिवसभरात 24 हजार 645 रुग्ण आढळून आले आहेत. काल नवीन 19463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 22 लाख 34 हजार 330 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 2 लाख 15 हजार 241 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22 % झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. दिवसभरात 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती

पुण्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. काल दिवसभरात 2 हजार 342 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 1 हजार 789 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. पुण्यात काल दिवसभरात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 2 रुग्ण हे पुण्याबाहेरील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पुण्यात सध्या 524 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 23 हजार 65 आहे.  (Pune Corona Update  private hospital refuse to reserve beds)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर, गिरीश बापट यांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र

Pune Corona | पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु करणार, महापौरांची माहिती

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.