AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Coronavirus: दुकाने उघडलीत तर कारवाई होणार; आयुक्तांचा व्यापाऱ्यांना इशारा

पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अत्यावश्‍यक वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. | Pune Coronavirus

Pune Coronavirus: दुकाने उघडलीत तर कारवाई होणार; आयुक्तांचा व्यापाऱ्यांना इशारा
1 जूनपासून सरसकट सगळीच दुकानं उघडू नका
| Updated on: Apr 09, 2021 | 8:32 AM
Share

पुणे: राज्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना निर्बंधांमुळे आक्रमक झालेल्या व्यापारी वर्गाने पुण्यातील दुकाने उघडण्याचा चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे (Pune Coronavirus) आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील दुकाने उघडल्यास कारवाई करण्याचा इशारा व्यापाऱ्यांना दिला आहे. (Action will be taken agianst open shops in Pune)

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात अनेक ठिकाणी व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे. पुण्यातील व्यापारीही त्याला अपवाद नाहीत. पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाविरोधात शहरातील व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज आपली दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडण्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यास राज्य शासनाच्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला. तसेच शहरात घातलेल्या निर्बंधांची अधिक कडक अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेकडून पोलिसांना आणखी काही अधिकार दिले जाणार असल्याचेही आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर ‘हाऊसफुल्ल’

एकीकडे पुण्यातील व्यापारी कोरोनाचे निर्बंध पाळणार नाही या भूमिकेवर ठाम असताना पुण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा धडकी भरवणार आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडू लागल्या आहेत.

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे. अवघ्या 12 दिवसांमध्ये हे सेंटर भरले आहे. सध्याच्या घडीला या कोव्हिड सेंटरमध्ये 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असतानाही या कोव्हिड सेंटरमध्ये 300 ते 400 रुग्ण होते. मात्र, आता हे कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे.

पुणेकरांनो सावध राहा; एकही व्हेंटिलेटर बेड उरला नाही

पुण्यात सध्याच्या घडीला रुग्णाला व्हेंटिलेटवर ठेवायचे झाल्यास एकही बेड शिल्लक नाही. तर कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ऑक्सिजन बेडसची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण पुणे जिल्ह्यात केवळ 376 ऑक्सिजन बेडस उरले आहेत. व्हेंटिलेटर्स बेडससाठी रुग्ण अक्षरश: वेटिंग लिस्टमध्ये आहेत. एखादा बेड खाली झालाच तर तात्काळ तो भरला जातो. राज्याच्या इतर भागातूनही पुण्यात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा प्रकोप असाच वाढत राहिल्यास काय करायचे, असा प्रश्न प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

संबंधित बातम्या:

पुण्यात कोरोनाचा कहर, रुग्णांसाठी बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि लसीची आकडेवारी काय? वाचा आयुक्तांची माहिती

कोरोना झालाय, पण घरीच राहून उपचार घ्यायचेत , मग 25 हजाराच्या बाँडवर सही करा

पुणेकरांनो सावध राहा; एकही व्हेंटिलेटर बेड उरला नाही, फक्त 376 ऑक्सिजन बेड शिल्लक

(Action will be taken agianst open shops in Pune)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.