Pune News : दहीहंडी उत्सवात पुणे शहरात कुठे राहिला सर्वाधिक दणदणाट
IMD Weather forecast : राज्यात गुरुवारी सर्वत्र दहीहंडीचा उत्सव होता. पुणे अन् मुंबईत राजकीय दहीहंडीमुळे स्पर्धाच लागली होती. या उत्सावात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन अनेक ठिकाणी झाले. पुणे शहरात आवाजाची मर्यादा ओलांढली गेली.
पुणे | 8 सप्टेंबर 2023 : राज्यात दहीहंडीचा उत्साह गुरुवारी दिसून आला. गोविंदा पथकाने या उत्सवासाठी महिन्याभरापासून तयारी केली होती. त्यांच्या या उत्सावात गुरुवारी सकाळपासून वरुणराजानेही हजेरी लावली. यामुळे गोविंदाचा उत्साह द्विगुणीत झाला होता. उंचावर बांधलेली दहीहंडी फोडून लाखो रुपयांची बक्षीसे मिळवण्यासाठी गोविंदा आणि गोपिकांमध्ये चुरस लागली होती. श्वास रोखायला लावणारा थरांचा थरार सर्वत्र दिसत होता. यामुळे उत्साहपूर्ण वातावरणात पुणे, मुंबई, ठाणे शहरासह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह दिसला. पर्यंत या उत्साहात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले.
पुणे शहरात कुठे राहिला सर्वाधिक दणदणाट
पुणे शहरात संध्याकाळापासून डीजेचा कर्कश आवाज सुरु झाला होता. रात्री दहा वाजेपर्यंत हा दणदणाट सुरु होता. सर्वाधिक आवाज पेठांमध्ये राहिला. नारायण पेठेत सर्वाधिक आवाजाची पातळी गाठली गेली. दहीहंडीला असलेल्या आवाजाच्या पातळीची मोजणी सीओईपीकडून करण्यात आली. त्यात नारायणपेठेत ११० डिसिबल आवाजाची पातळी गाठली गेल्याचे स्पष्ट झाले.
या ठिकाणी अधिक पातळी
बाजीराव रस्ता येथे शंभर डेसिबलपेक्षा जास्त आवाज होता. या ठिकाणी १०८.३ तर संभाजी उद्यान येथे १०५.२ डेसिबल आवाजाची पातळी होती. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स.प. महाविद्यालय येथेही आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांढली गेली. या ठिकाणी अनुक्रमे १०४.४, १०३.५ आवाज राहिल्याची नोंद झाली. गरवारे चौकात १०३.४ तर सदाशिव पेठेत १००.२ डेसिबल आवाजाची नोंद झाली.
काय हवी मर्यादा
पर्यावरण कायद्यातील तरतुदीनुसार शांतता क्षेत्रात ५० डिसिबल आवाजाची मर्यादा हवी. रहिवासी भागात ही मर्यादा ५५ डिसिबल तर व्यावसायिक भागात ६५ डिसिबल मर्यादा आहे. परंतु पुणे शहरातील अनेक ठिकाणी ही मर्यादा ओलांडली गेली आहे. शहरातील १० पैकी सात ठिकाणी ही पातळी शंभर डेसिबलपेक्षा जास्त होती.
पुणे शहरात तृतीयपंथीची दंहीहंडी
पुणे शहरात एक अनोखी दहीहंडी या वर्षी प्रथमच झाली. या दहीहंडी तृतीयपंथी गोविंदा पथकाने फोडली. यावेळी तृतीयपंथी आपला भावना व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, आम्ही समाजाचा वेगळे घटक नाही तर समाजाचा भाग आहोत. आम्हाला संधी हव्या आहेत. आता त्या संधी मिळत आहेत. यापेक्षा आम्हाला आणखी जास्त काही नको आहे. आम्ही जे काही ठरवलं त्यापेक्षा खूप काही आम्हाला मिळाले.