AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Dilip Walse-Patil : ‘काहीजण परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतात, पण…; पुण्यातल्या कार्यक्रमात दिलीप वळसे पाटलांचा विरोधकांना टोला

राज्यातील कायदा-सुव्यवस्था (Law & order) बिघडली असल्याचे विरोधक म्हणतात. मात्र अशी कोणतीही गंभीर परिस्थिती आपल्या राज्यात नाही. ती बिघडवणाऱ्यांसोबत कसे लढायचे, याचे मार्गदर्शन शरद पवार यांच्याकडून मिळत असल्याचे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Pune Dilip Walse-Patil : 'काहीजण परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतात, पण...; पुण्यातल्या कार्यक्रमात दिलीप वळसे पाटलांचा विरोधकांना टोला
कायदा सुव्यवस्थेवरून विरोधकांवर टीका करताना दिलीप वळसे पाटीलImage Credit source: tv9
| Updated on: May 28, 2022 | 2:58 PM
Share

पिंपरी चिंचवड : राज्यात कसलीही परिस्थिती गंभीर नाही, सर्व काही ठीक आहे. काही जण परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्याला कसे पुरून उरायचे हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे मार्गदर्शन आपल्याला असल्यामुळे तशी काही परिस्थिती नाही. तशी काळजी पण करू नका, असे वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी केले आहे. ते पिंपरी चिंचवड येथे बोलत होते. येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्या निवृत्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभादरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीबाबत भाष्य केले. राज्यातील कायदा-सुव्यवस्था (Law & order) बिघडली असल्याचे विरोधक म्हणतात. मात्र अशी कोणतीही गंभीर परिस्थिती आपल्या राज्यात नाही. ती बिघडवणाऱ्यांसोबत कसे लढायचे, याचे मार्गदर्शन शरद पवार यांच्याकडून मिळत असल्याचे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

‘…तर त्याला शिक्षा झाली पाहिजे’

ते पुढे म्हणाले, की आर्यन खान प्रकरणी न्यायालयाचा निर्णय आला आहे. आर्यनवरील आरोपात काही तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे चार्जशीटमधून त्याचे नाव वगळले गेले आहे. यासंदर्भात केंद्रानेदेखील दखल घेतली आहे. समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होईल. चुकीच्या पद्धतीने कुणाला अडकवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची भूमिका राहील. तर केंद्र सरकारदेखील त्यांच्यावर कारवाई करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘तो काही आंतरराष्ट्रीय प्रश्न नाही’

नवनीत राणा आणि रवी राणा नागपूर विमानतळावर पोहोचले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारव टीका केली. यावर दिलीप वळसे पाटील यांनी जास्त काही न बोलता सध्या तो काही आंतरराष्ट्रीय प्रश्न नाही, त्यामुळे त्याला एवढे महत्त्व द्यायची गरज नाही, असे म्हटले आहे.

काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?

‘चौकशी संपल्यावरच त्यावर बोलेन’

पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याबाबतचे पत्र दिलीप वळसे पाटील यांच्यापर्यंत पोहोचले आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्र पोहोचले असून त्याची चौकशी सुरू आहे. चौकशी संपल्यावरच त्यावर बोलेन, असे वळसे पाटील म्हणाले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.