Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! पुण्यात संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी लागू, दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार, नवी नियमावली जारी

पुणे महापिलाकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी नवी नियमावली जारी केली आहे. याबाबत महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे (PMC Commissioner Vikram Kumar declare new restriction amid corona pandemic Vikram Kumar declare new restriction amid corona pandemic).

मोठी बातमी ! पुण्यात संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी लागू, दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार, नवी नियमावली जारी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 6:27 PM

पुणे : महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. पुण्यात महापालिकेने आता पुन्हा नवी नियमावली जारी करत निर्बंध लागू केले आहेत. आगामी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका धोका लक्षात घेऊन ही संबंधित कारवाई केली जात आहे. पुणे महापिलाकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी नवी नियमावली जारी केली आहे. याबाबत महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन माहिती दिली (PMC Commissioner Vikram Kumar declare new restriction amid corona pandemic).

पुण्यातील नव्या नियमावलीत नेमके नवे नियम काय?

1) अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने दररोज दुपारी चार पर्यंत सुरु राहतील.

2) अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त असलेले सर्व दुकाने हे सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत सुरु राहतील.

3) मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद

4) रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. दुपारी चार नंतर आणि शनिवार-रविवारी पार्सल सेवा सुरु ठेवण्यास मुभा.

5) लोकल ट्रेनमधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील, शासकीय कर्मचारी, बंदरे सेवा, विमानतळ सेवा यांना प्रवास करण्यास परवानगी

6) उद्याने, खुली मैदाने, चालणे, सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत सुरु राहील.

7) सर्व खासगी कार्यालयांमध्ये फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक, तसेच कार्यालये फक्त संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.

8) शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

9) सर्व आऊटडोअर स्पोर्ट्स सकाळी पाच ते नऊ या दरम्यान सुरु राहतील.

10) सामाजिक, धार्मिक आणि मनोरंजनाचा कार्यक्रम फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी. कार्यक्रम फक्त 3 तासांचा असावा. याशिवाय या ठिकाणी खाद्यपदार्थाचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

11) धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद. फक्त पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी परवानगी

12) लग्नासाठी 50 लोकांची परवानगी

13) अंत्यसंस्कार, दशक्रियाविधी किंवा त्याच्याशी संबंधित कार्यक्रमांसाठी फक्त 20 लोकांना परवानगी

14) कामगारांची राहण्याची व्यवस्था असेल त्याचठिकाणी बांधकाम सुरु राहील.

15) कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालांची विक्री करणारे दुकाने, गाळे हे आठवड्यातील सातही दिवस संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार

महापौरांचं ट्विट 

गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल (25 जून) पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.

निर्बंध शिथिल केल्यानंतर पॉझिटिव्हिटी दरचा वाढताना दिसत आहे. त्यामुळे तो आणखी वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे तूर्तास जे निर्बंध लागू आहेत तेच पुढे लागू राहतील, असं वळसे पाटील यांनी सांगितलं. तसेच शाळा- कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद असतील, असंही नमूद केलं.

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.