Pune News | संभाजी भिडे विरुद्ध पुणे न्यायालयात खटला, कोरेगाव भीमा प्रकरणात कोणाची झाली उलटतपासणी

Pune News | शिवप्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यासमोर अडचणी वाढणार आहे. त्यांच्याविरोधात पुणे न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे. पोलिसांनी तक्रारीवर काहीच कारवाई केली नसल्यामुळे याचिका दाखल करणार आहे.

Pune News | संभाजी भिडे विरुद्ध पुणे न्यायालयात खटला, कोरेगाव भीमा प्रकरणात कोणाची झाली उलटतपासणी
Pune CourtImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 2:20 PM

पुणे | 15 सप्टेंबर 2023 : महात्मा गांधी, क्रांतीज्योती महात्मा फुले आणि इतर अनेक राष्ट्रपुरुष, विचारवंत यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोपावरुन संभाजी भिडे यांच्या विरोधात शुक्रवारी याचिका दाखल करण्यात येणार आहे. पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्यासह डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. विश्वमभर चौधरी, अन्वर राजन, मेधा पुरव सामंत, युवराज शाह, प्रशांत कोठडीया, संकेत मुनोत, जांबुवंत मनोहर हे यावेळी उपस्थित राहणार आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी कारवाई केली नसल्याने याचिका दाखल केली जात आहे.

एल्गार परिषद प्रकरणात चौकशी

कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाकडून हर्षाली पोतदार यांची उलट तपासणी करण्यात आली. शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी कोरेगाव-भीमा येथील लढाई कोणत्याही विशिष्ट जाती, धर्माशी जोडता येणार नाही, या दाव्याला त्यांनी आयोगासमोर दुजोरा दिला नाही. कोरेगाव-भीमा येथे एल्गार परिषदेनंतर दंगल झाली होती. यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. हर्षाली पोतदार यांनी संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर दंगलीचे आरोप केले होते.

दुष्काळासाठी पुणे जिल्ह्यात असा उपाय

यंदा देशासह राज्यात पाऊस कमी पडला आहे. यामुळे दुष्काळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील रांजे गावात वनराई बंधारे बांधून आतापासून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या बंधाऱ्यांमध्ये अंदाजे 2 लाख लिटर पाणी साठणार आहे. त्याचा फायदा शेतकर्‍यांना तसेच पाळीव जनावारांना होणार आहे. रांजे गावात आणखी २ बंधारे बांधले जातील, असे ग्रामसेवक भूषण पुरोहित यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरात डंपर आणि ट्रेलरचा अपघात

पुणे शहरात डंपर आणि ट्रेलरचा अपघात झाला. पुण्यातील नवले चौकात सिग्नलवर उभा असलेल्या डंपरला आयशरला ट्रेलरने पाठीमागून धडक दिली. या अपघातात आयशर गाडीचा ड्रायव्हर जखमी झाला आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी सिंहगड रोड वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाकडून आंदोलन

राज्य सरकारने सरकारी नोकरी भरतीत कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले. पिंपरीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले आहे. यासंदर्भात काढलेला जीआर फाडून केराच्या टोपलीत टाकत आंदोलन करण्यात आले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.