खाते वाटप झाले पण पुणे पालकमंत्री पदावरुन होणार वाद, कोणते ‘दादा’ घेणार पालकत्व

Ajit Pawar and Chandrakant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. बारा दिवसांनी झालेल्या खातेवाटपात त्यांना हवी असलेले अर्थ अन् नियोजन खाते त्यांना मिळाले. आता पालकमंत्री कोण होणार?

खाते वाटप झाले पण पुणे पालकमंत्री पदावरुन होणार वाद, कोणते 'दादा' घेणार पालकत्व
Chandrakant Patil and Ajit Pawar
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 6:44 PM

पुणे, दिनांक 14 जुलै 2023 : राज्यातील राजकारणात गेल्या पंधरा दिवसांपासून मोठे बदल झाले. २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार करत उपमुख्यमंत्रीपद पटकवले. त्यानंतर अजित पवार यांना हवे असलेले अर्थ अन् नियोजन खाते त्यांना मिळाले. त्यांना हे खाती देऊ नये, असा दबाव शिवसेनेकडून होता. परंतु अखेर त्यांना ती खाती मिळाली. आता त्यांचे लक्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे. परंतु अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यामुळे खाते वाटपानंतर पालकमंत्री पदावरुन वाद रंगणार आहे.

काय आहे पुण्याचे गणित

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. परंतु आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांना हवे आहे. त्यांनी खातेवाटपात पहिली लढाई जिंकली आहे. शिवसेनेच्या विरोधानंतर त्यांना अर्थखाते मिळाले. आता पुण्याचे पालकमंत्री ते होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुणे पालकमंत्री पदावरुन भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरु झाली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांचा अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यास विरोध आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेतृत्व काय निर्णय घेणार? हा प्रश्न आहे.

का आहे भाजपचा विरोध

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी अन् भाजप दोन्ही पक्ष प्रभावी आहेत. पुणे जिल्ह्यात भाजप आमदार आणि नगरसेवकांची संख्या जास्त आहे. पालकमंत्री पद ज्याच्याकडे असेल त्या पक्षांची अनेक कामे होतात. यामुळे पुणे जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठी पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे ठेवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांना दिल्यास भाजप बॅकफूटवर जाईल, असे कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत.

हे सुद्धा वाचा

कोणते दादा होणार प्रभावी

पुणे जिल्ह्यात चंद्रकांत दादा पाटील अन् अजित दादा पवार आहेत. या दोन्ही दादांपैकी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे दादा कोण होणार? याकडे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.