यंदा आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल कमी, उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या घटली! काय आहे कारण?

गेल्या काही वर्षांत आयटीआय (ITI) प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पण यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे (Corona Lockdown) विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल कमी झाल्याचं दिसत आहे. कारण, पुणे विभागात उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या कमी झाली आहे.

यंदा आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल कमी, उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या घटली! काय आहे कारण?
आयटीआय महाराष्ट्र
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 5:10 PM

पुणे : दहावीनंतर काय करिअर करायचं असा प्रश्न येतो तेव्हा अनेक विद्यार्थी कौशल्यआधरित अभ्यासक्रमांना प्राधन्य देताना दिसतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत आयटीआय (ITI) प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पण यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे (Corona Lockdown) विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल कमी झाल्याचं दिसत आहे. कारण, पुणे विभागात उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या कमी झाली आहे. (Pune division has reduced the number of students seeking admission to ITI due to corona lockdown)

ITI साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

वाढत्या औद्योगिकरणामुळे (Industrialisation) आयटीआयच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. त्यामुळे आयटीआयच्या ठराविक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. परंतु, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्यावर्षी राज्यातल्या 3 लाख 32 हजार 128 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यंदा 2 लाख 17 हजार विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन पद्धीतीने शिक्षण घ्यावं लागत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात प्रशिक्षण देणाऱ्या आयटीआय अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली असावी असं सांगण्यात येत आहे.

10 हजार 880 विद्यार्थ्यांचाच अर्ज कन्फर्म

मागच्या वर्षी पुणे जिल्ह्यातल्या 11 हजार 552 जागांसाठी 15 हजार 865 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार प्रवेश मिळू शकला नाही. मात्र, यावर्षी 11 हजार 200 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यातल्या 10 हजार 880 विद्यार्थ्यांनीच आपला अर्ज कन्फर्म केला आहे. त्यामुळे यंदा उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.

आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी प्रयत्न

वाढत चाललेल्या औद्योगिकरणामुळे विद्यार्थ्यांना आयटीआयच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणं शक्य नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधाही उपबल्ध करून देण्यात आली आहे. आयटीआयला विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रोत्साहन अभियन राबवलं जात आहे.

संबंधित बातम्या :

Job Alert | पुणे जिल्ह्यात टपाल विभाग नियुक्त करणार विमा एजंट, 7 सप्टेंबरला थेट मुलाखती, काय आहे पात्रता?

IB Recruitment 2021: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 527 पदांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; परीक्षा ‘या’ तारखेला होणार, ॲडमिट कार्ड जारी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.