निवृत्तीस सहा महिने, डॉ.कलाम यांच्यांसोबत केले काम…कसे अडकले पाकिस्तानच्या हनीट्रॅपच्या जाळ्यात

Pune DRDO scientist in honey trap : पुणे एटीएसने गुरुवारी मोठी कारवाई केली. DRDO मध्ये संचालक असलेल्या व्यक्तीला पाकिस्तानला संवेदनशील माहिती मिळवल्याचा आरोपखाली अटक केलीय. हनीट्रॅपमध्ये अडकून त्यांनी ही माहिती दिलीय.

निवृत्तीस सहा महिने, डॉ.कलाम यांच्यांसोबत केले काम...कसे अडकले पाकिस्तानच्या हनीट्रॅपच्या जाळ्यात
Pune DRDO scientist
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 10:41 AM

पुणे : संरक्षण संशोधन संस्थेत (डीआरडीओ) मध्ये उच्च पदावर कार्यरत, निवृत्तीस केवळ सहा महिने, डॉ.अब्दुल कलाम यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्वासोबत काम करणारा अधिकारी पाकिस्तानच्या जाळ्यात अडकला. हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर आहे. पुण्यातील DRDO या संस्थेत संचालकासारख्या वरिष्ठ पदावर ते कार्यरत आहे. परंतु व्हाट्सॲप आणि व्हॉईस मेसेजद्वारे पाकिस्तानशी संपर्क ठेवल्याचा अधिकाऱ्यावर ठपका आहे.

अनेक प्रकल्पांवर काम

आरोपी अधिकाऱ्याने डीआरडीओच्या अनेक क्षेपणास्त्रांसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केल्याचे सांगितले जात आहे. त्याच्याविरुद्ध अधिकृत गुप्तता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीआरडीओकडून या संदर्भात तक्रार आल्यानंतर तपास सुरू करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एटीएसला सांगितले. आरोपीला बुधवारी अटक करून गुरुवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून एटीएसने त्याची कोठडी मिळवली.

हे सुद्धा वाचा

उच्च पदावर काम आणि पुरस्कार

डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी सहा वर्षे भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्यांसोबत काम केले. १९९८ मध्ये झालेल्या अणूचाचणी दरम्यान जे ३५ वैज्ञानिक होते, त्यात कुरुलकर यांचा समावेश होता. त्यांना २००० मध्ये सर्वोत्कृष्ट प्रकाशनासाठी विज्ञान दिन पुरस्कार मिळाला होता. २००२ मध्ये आत्मनिर्भरतेमध्ये उत्कृष्ठतेसाठी डीआरडीओ अग्नी पुरस्कार, २००८ मध्ये आकाशसाठी पथ ब्रेकिंग संशोधन पुरस्कार, उत्कृष्ट तंत्रज्ञान विकासासाठी डीआरडीओचा पुरस्कार मिळाला होता.

काय म्हणतात पोलीस

भारतीय संरक्षण सेवेत अनेक प्रकल्पांवर काम केलेले कुरुलकर हनीट्रॅपमध्ये कसे अडकले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत पुणे पोलिसांचे म्हणणे आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांची छायाचित्रे वापरून ज्येष्ठ शास्त्रज्ञाला फसवण्यात आले. यानंतर ते पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले. गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपासून व्हॉईस संदेश आणि व्हिडिओ कॉलद्वारे पाकिस्तानस्थित ऑपरेटरच्या संपर्कात ते होते. त्यांनी काही संवेदनशील माहिती शेअर केल्याचा संशय आहे.

निवृत्त होण्यास फक्त सहा महिने

डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हनीट्रॅपमध्ये अडकले. त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप आहे. त्यांना निवृत्त होण्यासाठी फक्त 6 महिने बाकी आहेत. परंतु ते पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील एका महिलेच्या संपर्कातही होते. DRDO ची व्हिजिलेंस व इंटीलिजेंस टीम अनेक महिन्यांपासून त्यांच्यांवर नजर ठेवून होती. डीआरडीओ मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर एटीएसने गुरुवारी त्यांना अटक केली.

हे ही वाचा

कराचीमधील हसीना, पुणे शहरातील दिवाना…सुरु झाली प्रेमकथा अन् घडली अद्दल

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.