Eknath Shinde : पुणे शहरात एकनाथ शिंदे गटाला धक्का, या नेत्याने दिला राजीनामा

Pune Eknath Shinde : शिवसेनेला पुणे शहरात धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकाने राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा सुरु होती. अखेर त्यांनी राजीनामा दिला.

Eknath Shinde : पुणे शहरात एकनाथ शिंदे गटाला धक्का, या नेत्याने दिला राजीनामा
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 11:16 AM

पुणे | 14 सप्टेंबर 2023 : शिवसेनेत बंड झाल्यानंतर दोन गट झाले होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या गटांमध्ये शिवसेना विखरली गेली. अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनेही एकनाथ शिंदे यांचा गटात प्रवास केला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा सुरु होती. अखेर त्यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या ते कोणत्या गटात जाणार? याची काही माहिती अद्याप दिलेली नाही.

कोणी सोडली एकनाथ शिंदे यांची साथ

पुणे शहरात शिवसेना एकनाथ शिंदे गटाला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ भिलारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते शिवसेनेचे उपशहर प्रमुख होते. गेल्या काही दिवसांपासून राजाभाऊ भिलारे नाराज असल्याची चर्चा होती. यामुळे शिंदे गटाकडून त्यांची मनधरणी केली जात होती. मात्र, बुधवारी तातडीने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुण्यात एकनाथ शिंदे गटाने विश्वासू मोहरा गमवला आहे. आपण कोणाच्या ही बंधनात काम करू शकत नाही,” असे सांगत त्यांनी राजीनामा दिला आहे.

काय होती जबाबदारी

गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाऊंडेशची जबाबदारी राजाभाऊ भिलारे यांच्यावर होती. ते या संस्थांचे प्रचार आणि प्रसारचे काम करत होते. राजाभाऊ भिलारे हे शिंदे गटात सामील होणारे पुणे शहातील पहिले शिवसैनिक होते. परंतु आता ते शिवसेनेतून बाहेर पडले आहे. ते आता कोणत्या पक्षात जातात? याकडे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले राजाभाऊ

बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रभावित होऊन आपण शिवसेनेचे काम सुरु केले होते. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणूनच आपण काम करत होतो. हे काम करताना पदाधिकारी म्हणून मान, सन्मान, अपमान सर्व सहन केले. मी हे काम करत असताना कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफ करावे, असे राजाभाऊ भिलारे यांनी म्हटले आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.