आयटी इंजिनिअरने नोकरी सोडून सुरु केली शेती, अन् आंबा लागवडीतून घडवली क्रांती
Pune software engineer : पुणे शहरात सॉफ्टवेअर इंजिनअरने नोकरी सोडली अन् शेती सुरु केली. अनेकांनी या निर्णयावर टीका केली. आता यश मिळाल्यानंतर परिसरात त्याच्या कामाचे कौतूक होत आहे. त्याची शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी येत आहेत.
पुणे : शेती फायद्याची राहिली नाही, शेतीमध्ये नुकसान होते, अशी तक्रार अनेकवेळा केली जाते. परंतु केल्यामुळे होते आधी केले पाहिजे, याप्रमाणे काम केल्यास यश नक्कीच मिळते. पुणे शहरात सॉफ्टवेअर इंजिनअर म्हणून नोकरी करणाऱ्या तरुणाने शेती यशस्वी करुन दाखवली. सॉफ्टवेअरमधील लाखोंचे पॅकेज सोडून गावी जाऊन त्याने शेती सुरु केली. आता शेतीत नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवत आहे. यामुळे त्याची शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी येत आहे. विजय पवार असे या तरुणाचे नाव आहे.
आंबा शेती केली सुरु
विजय पवार याने भोपाळमधून इंजिनिअरींग पूर्ण केले. त्यानंतर पुणे शहरातील सॉफ्टवेअर कंपनीत रुजू झाला. त्याला 7 लाख रुपयांचे पॅकेज होते. 5 वर्षांपूर्वी विजयने नोकरी सोडली. आपल्या पश्चिम बंगालमधील गावी आला. 7 एकर जागेत आंब्यांच्या विविध जातींची 1200 रोपे लावली होती. आंबे लागवडीतून गेल्या वर्षीपासून उत्पन्न सुरु झाले. पहिल्या पिकातून पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यानंतर आता हे उत्पन्न नऊ लाखांपर्यंत गेले आहे.
आंब्यामध्ये घेतले आंतरपीक
विजय पवार यांने आंबा बागेत आंतरपीक घेतले. भोपळे आणि टरबूज लावून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला. भोपळा आणि टरबूज यातून दरवर्षी दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. या बागेत त्याने फणसाची लागवड केली आहे. दरवर्षी दोन लाख रुपयांची फणसही विकली जाते, असे ते सांगतात.
अशी आली कल्पना
पश्चिम बंगालमधील मुलताईपासून 30 किमी अंतरावर मुलताई-छिंदवाडा महामार्गावर असलेल्या दुनावा गावात विजय पवार राहतो. घरगुती कारणामुळे वार्षिक 7 लाख रुपयांचे पॅकेज सोडून गावी आला. काहीतरी नवीन करण्याचा विचार त्यांच्या मनात सुरू होता. नवीन कल्पना घेऊन उत्पन्न वाढवण्याचा विचार तो करत होतो. वेगवेगळ्या कल्पना मनात आल्या. त्याला शेती करायची इच्छा होती, पण ती पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने करायची होती. मग रत्नागिरीला आला. तिथे त्याने आंब्याची बाग पाहिली अन् आंब्याची बाग लावायची कल्पना आली. आज ती यशस्वी झाली आहे.
शेती ठरु शकते फायद्याची
शेतीमध्ये काही बदल केले तर ती फायद्याची ठरु शकते. फक्त पारंपारीक शेतीला आधुनिकतेची जोड देण्याची गरज असल्याचे विजय पवार याने सांगितले. त्याची आब्यांची फळबाग पाहण्यासाठी आता लांबून लांबून शेतकरी येत आहे. विजय पवार त्यांना सर्व मार्गदर्शनही करत आहे.
हे ही वाचा
पुणे शहरातील लोकांना काय आवडते | देशी मद्य, विदेशी मद्य, वाईन की बियर?