चक्क इमारत उचलून ९ फुट मागे घेण्याचा पुणेरी प्रयोग, पाहा व्हिडिओ

विकास कामामुळे इमारत तोडावी लागणार होती. त्यापेक्षा उभी इमारत मागे कशी घेता येते, त्याचा शोध इमारतीच्या मालकांनी सुरु केला. हे शक्य असल्याचे त्यांना समजले. त्यांनतर त्याचा पध्दतीने इमारत मागे घेण्याचा निर्णय घेतला. पुणे परिसरात हा पहिलाच प्रयोग होत आहे.

चक्क इमारत उचलून ९ फुट मागे घेण्याचा पुणेरी प्रयोग, पाहा व्हिडिओ
इमारत सरकवण्याचे काम सुरु असतानाImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 9:49 AM

नविद पठाण, बारामती, पुणे : बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या निर्मितीसाठी भूसंपादन करण्यात आले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील मासाळवाडी परीसरातील मुलाणी कुटुंबियांनी वडिलांची आठवण जपण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चक्क दोन मजली इमारत उचलुन ९ फुट मागे सरकविण्याचा प्रयोग सुरु केला आहे. ती इमारत ‘जशी च्या तशी’ पाठीमागे घेण्याचे काम सुरु आहे. हा प्रयोग पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

मुलाणी कुटुंबियांनी आशियाना कॉम्प्लेक्स ही दुमजली वास्तू उभी केली होती.पालखी मार्गात येणारी ही दुमजली इमारत उध्द्वस्त करायला या कुटुंबाचे धाडस झाले नाही. कारण चार वर्षा पूर्वी अकबर मुलांणी यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांचे या इमारतीत वास्तव्य होते. त्यांची आठवण म्हणून ही इमारत आहे, तशीच ठेवायची होती. ती आठवण जतन करण्याची जिद्द या कुंटुने बांधली. त्यामुळे पालखी महामागार्ला अडसर ठरणारी इमारत न पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

इमारत जपण्यासाठी काय केले

मुलाणी कुटुंबियांनी सोशल मिडीयाचा वापर सुरु केला. उभी इमारत मागे कशी घेता येते, त्याचा शोध सुरु केला. हे शक्य असल्याचे त्यांना समजले. त्यांनतर त्याचा पध्दतीने इमारत मागे घेण्याचा निर्णय घेतला. या भागात हा पहिला प्रयोग असल्याने त्याची उत्सुकता अधिक आहे.

तीन हजार फुटांची इमारत

काटेवाडीतील अकबर दादासाहेब मुलानी व हसन मुलाणी या भावंडांनी त्यांची तीन हजार फूट दुमजली इमारत चक्क ९ फूट मागे सरकविण्याचे काम सुरु केले आहे. त्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे.आता हे काम पूर्णत्वाकडे आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ही इमारत पाच फूट उंच उचलून नऊ फूट मागे घेतली जाणार आहे. यासाठी हरियाणा येथील मोहन लाल हाऊसिग लिप्टींग स्पिंटीग कन्ट्रक्शन कंपनी नूरबाला, पानिपत (हरियाणा ) प्रशिक्षित ठेकेदार काम करीत आहेत.

ठेकेदाराने अन्य ठिकाणी केले प्रयोग

मोहनलाल नावाच्या या ठेकेदाराने आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह अन्य राज्यातील एक हजाराहून अधिक इमारती मागे घेतल्याचा दावा केला आहे. आता काटेवाडीतील मासाळवाडी परिसरातील हा प्रयोग सुरू आहे. यावेळी बोलताना अकबर मुलाणी यांनी सांगितले की, रस्त्यात इमारत ५ फुट जात होती. निम्म्याहून जास्त इमारत सुस्थितीत शिल्लक राहणे शक्य होते.

आमची पाठीमागे स्व:तची जागा शिल्लक होती.तसेच ही इमारत पाडायला देखील मोठा खर्च येत होता. नव्याने इमारत उभी करण्यासाठी ५० लाख रुपये खर्च येणार होता.सोशल मिडीयावर हरियाणातील या पध्दतीचे काम करण्याबाबत माहिती मिळाली. त्यांनी या सर्व इमारतीचा मागे घेण्याचा दहा लाख रुपयाहून जास्त खर्च सांगितला. इमारत पाडण्यापेक्षा ती मागे घेऊनच त्याचा पुनर्वापर करता येणे शक्य आहे.त्यासाठी हा पर्याय निवडला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.