सहा लाखांचे कबुतर विकत घ्या, मुलाचा मृत्यू टळेल, पुण्यातील कुटुंबाची अंधश्रद्धेतून लूट

पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या कुटुंबाची सहा लाख 80 हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली (Pune family pigeon superstitions)

सहा लाखांचे कबुतर विकत घ्या, मुलाचा मृत्यू टळेल, पुण्यातील कुटुंबाची अंधश्रद्धेतून लूट
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 12:06 PM

पुणे : अंधश्रद्धेचा फायदा घेत पुण्यातील कुटुंबाची जवळपास पावणेसात लाख रुपयांना फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवत भोंदूबाबाने कुटुंबाला सहा लाख रुपयांचे कबुतर विकत घ्यायला लावल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Pune family looted to buy pigeon for 6 lacks under superstitions)

मुलाच्या मृत्यूची भीती दाखवून लूट

पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या कुटुंबाची सहा लाख 80 हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली. तुमच्या मुलावर करणी झाल्याची खोटी बतावणी भोंदू व्यक्तीने संबंधित कुटुंबाला केली. करणीमुळे मुलाचा मृत्यू संभवतो, अशी भीती दाखवून आरोपीने करणी काढण्याच्या नावाखाली कुटुंबाला सहा लाख रुपये किमतीचे कबुतर विकत घ्यायला लावले.

सहा लाखांच्या कबुतरामुळे मृत्यू टळण्याची बतावणी

कबुतर विकत घेतल्यास घरातील व्यक्तीचा मृत्यू टळेल, आणि त्याच्या ऐवजी कबुतरांचा मृत्यू होईल, अशा भूलथापा लावत कुटुंबाकडून आरोपीने तब्बल सहा लाख ऐंशी हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबिजुर फतेहपुर वाला यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर आरोपी कुतूबुद्दिन नजमी याला पोलिसांनी अटक केली.

नागपुरात भोंदूबाबाकडून एकाच कुटुंबातील चौघींवर अत्याचार

भोंदूबाबानं मृत्यूची भीती दाखवत आणि आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याच्या नावाखाली एकाच कुटुंबातील चार महिलांवर अत्याचार केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पूजा करण्याच्या नावाखाली चौघी महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणीने तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी भोंदूबाबाला अटक केली असून अशा प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. (Pune family looted to buy pigeon for 6 lacks under superstitions)

हिंगोलीत अंधश्रद्धेतून मांडूळाची तस्करी

दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयांची किंमत असलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळाची अंधश्रद्धेतून तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना हिंगोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघा आरोपींकडून दोन जिवंत मांडूळ जप्त करण्यात आले असून या मांडूळांची किंमत अंदाजे 15 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मांडूळाबाबत बऱ्याच अंद्धश्रद्धा आहेत. मांडूळाद्वारे काळू जादू, अघोरी विद्या, पैशांचा पाऊस, गुप्त धन शोधणे यासारख्या अंद्धश्रद्धांसाठी सर्रास केला जातो.

संबंधित बातम्या :

हिंगोलीत लाखो रुपयांच्या मांडूळांची तस्करी करणारे दोघे जण अटकेत

धक्कादायक! भोंदूबाबाकडून एका कुटुंबातील 4 महिलांवर अत्याचार

(Pune family looted to buy pigeon for 6 lacks under superstitions)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.