पुणे शहरात घर घेणे होणार अवघड, किंमती वाढणार, काय आहे कारण

Pune Property : पुणे शहरात तुम्ही घर घेण्याचा विचार करत असल्यास लवकर खरेदी करा. कारण काही दिवसांत पुणे शहरातील घरांच्या किंमती वाढणार आहेत. शासनाच्या एका निर्णयामुळे या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे आताच घर घेणे फायदेशीर ठरणार आहे.

पुणे शहरात घर घेणे होणार अवघड, किंमती वाढणार, काय आहे कारण
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 3:36 PM

पुणे : पुणे शहरात तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर घेण्यासाठी आता जास्त पैसै मोजावे लागणार आहे. पुणे शहरातील घरे महागणार आहे. जर तुम्ही आता घर खरेदीचा निर्णय घेतला नाही, तर पुणेकर होण्याचे स्वप्न स्वप्नच राहू शकते. कारण येत्या आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने वाढीव दराचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. तो मान्य झाल्यास गेल्या काही वर्षातील ही सर्वाधिक वाढ असणार आहे.

किती वाढणार दर

नवीन आर्थिक वर्षापासून पुणे शहरातील घरे महाग होण्याची शक्यता आहे. मुद्रांक शुल्क विभागाने सन २०२३-२४ साठी वाढीव दराचा प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये पुणे शहरात 8 ते 15 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 10 ते 15 टक्के तर ग्रामीण भागात 5 ते 7 टक्के दर वाढ प्रस्ताव आहे. रेडी रेकनर दर 1 एप्रिल 2023 बदलले जात असतात. रेडी रेकनरच्या वाढीव प्रस्तावाला शासनाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. परंतु हा प्रस्ताव मान्य झाल्यास पुण्यातील घरांच्या किमती वाढणार आहेत.यामुळे पुणे शहर आणि परिसरातील घरांच्या किंमती पुन्हा वाढणार आहेत.

हे सुद्धा वाचा

कसे झाले बदल

पुण्यात 2018-19 आणि 2019-20 मध्ये रेडी रेकनरचे दर हे स्थिर होते. त्यात काहीच बदल केला गेला नव्हता. त्यानंतर 2020-21 मध्ये 1.25 टक्के तर 2021-22 या वर्षात 5 टक्के दरवाढ केली. तो कोरोनाचा काळ होता. पुन्हा 2022-23 या आर्थिक वर्षात 9.2 टक्के दर वाढ झाली. आता तब्बल 15 टक्के दरवाढ प्रस्तावीत आहे. ही दरवाढ लागू झाली तर आजपर्यंची ही सर्वात मोठी दरवाढ असेल.

का आले महत्व

पुरंदरमध्ये विमानतळ होणार आहे. तसेच रिंग रोड, मेट्रो, महामार्गाचे रुंदीकरण होत आहे. त्यामुळे पुणे शहराजवळील ग्रामीण भागातील जमिनीच्या किंमती वाढल्या आहेत. याचा देखील परिणाम घरांच्या किंमतीवर होऊन घरांच्या किंमती वाढणार आहेत.

पुणे शहरात विक्रमी दर

पुणे शहरातील भूखंड विक्रीचा यंदा विक्रम झाला आहे. सण 2022 मध्ये अडीच हजाराहून जास्त जणांनी भूखंड खरेदी केली आहे. एकूण 2582 पुणेकरांकडून नवीन जमिनीची खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. पुणे शहरात गेल्या दहा वर्षात यंदा सर्वात जास्त जमिनीची खरेदी झाली आहे. खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, यामुळे जमिनीच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.

पुणे शहरातील भूखंडांना सोन्यासारखी झळाळी, दहा वर्षात जमीन खरेदीचा यंदा विक्रम..वाचा सविस्तर…

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.