Pune Ganpati Visarjan Mirvnuk 2023 : गणरायाला निरोप देण्यासाठी पुणे शहर प्रशासन सज्ज; कुठे-कुठे विसर्जन करता येणार? वाचा…

Pune Ganpati Festival 2023 Visrjan Mirvnuk : बाप्पाला निरोप देण्याचा क्षण जवळ येतोय. विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहर प्रशासन सज्ज; काय आहे नियमावली? मानाच्या गणपतींचं विसर्जन कुठे होणार? गणपतींचं कुठे-कुठे विसर्जन करता येणार? मिरवणूक कधी निघणार? वाचा सविस्तर वृत्तांत...

Pune Ganpati Visarjan Mirvnuk 2023 : गणरायाला निरोप देण्यासाठी पुणे शहर प्रशासन सज्ज; कुठे-कुठे विसर्जन करता येणार? वाचा...
गणेश विसर्जनImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 4:21 PM

पुणे | 27 सप्टेंबर 2023, योगेश बोरसे : दहा दिवसांच्या गणपतीचं उद्या विसर्जन केलं जाणार आहे. गणरायाला निरोप देण्याची वेळ जवळ येतेय. गणपतीला निरोप देताना मोठमोठ्या मिरवणुका निघतात. लोक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी होतात. पुण्यात तर गणेशभक्त आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत उत्साहाने सहभागी होतात. अशाच रस्त्यांवरही गर्दी पाहायला मिळते. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली आहे. विसर्जनासाठीची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहर सज्ज झालं आहे. पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून विसर्जनासाठी तयारी पूर्ण झाली आहे. शहरभरातील 2000 पेक्षा अधिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं उद्या विसर्जन होणार आहे. महानगरपालिकेकडून शहरात 18 ठिकाणी विसर्जन घाट तयार करण्यात आला आहे. तर मानाच्या गणपतीचा विसर्जन मिरवणुकीचा रथ देखील सजला आहे.

उद्या महात्मा फुले मंडईतून सकाळी होणार विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला दुपारी 4 वाजता सुरुवात होईल. मानाचा पहिला कसबा गणपतीची सकाळी 8.30 वाजता उत्सव मंडपातून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होईल. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती सकाळी 9 वाजता उत्सव मंडपातून मिरवणुक निघेल. 10.30 वाजता मंडईतून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होईल. मानाचा तिसरा गुरुजी  तालीम गणेश मंडळाची सकाळी 10 वाजता उत्सव मंडपातून मिरवणूक निघेल. 10.30 वाजता मंडई मधुन विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती सकाळी 9.45 वाजता उत्सव मंडपातून मिरवणूक निघेल. 10.30 वाजता मंडई मधुन विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होईल. मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती सकाळी 9.45 वाजता उत्सव मंडपातून मिरवणूक निघेल. 10.30 वाजता मंडईमधून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते 3.30 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा अभिषेक होणार आहे. तर 4 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाची सकाळी 10 वाजता उत्सव मंडपातून मिरवणूक निघेल. 10.30 वाजता मंडईमधून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.