Pune Gold Rate | पुण्यात सोन्याला झळाळी, एका दिवसांत 190 रुपयांनी वाढलं सोनं, जाणून घ्या आजचे दर

एकीकडे पुण्यात सोन्याचा दर वाढत असल्याचं दिसत असलं तरी दुसरीकडे चांदीचा दर मात्र कोसळताना दिसतोय. आज पुण्यात चांदीच्या दरात 300 रुपयांची घसरण पहायला मिळाली. आज पुण्यात एक किलो चांदीचा दर 62 हजार 200 रुपये आहे.

Pune Gold Rate | पुण्यात सोन्याला झळाळी, एका दिवसांत 190 रुपयांनी वाढलं सोनं, जाणून घ्या आजचे दर
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 4:38 PM

पुणे : पुण्यात (Pune) सोन्याला झळाळी आल्याचं चित्र आहे. कारण कालपासून एका दिवसांत सोन्याच्या दरात (Gold Rate in Pune) 190 रुपयांची वाढ झाली आहे. आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 48, 810 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 45 हजार 590 रुपये आहे. काल पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 48 हजार 620 रुपये इतका होता तर 22 कॅरेट सोन्याचा दर 4 हजार 400 इतका होता. (In one day, gold price has gone up by Rs 190 in Pune)

चांदीच्या दरात मात्र घसरण

एकीकडे पुण्यात सोन्याचा दर वाढत असल्याचं दिसत असलं तरी दुसरीकडे चांदीचा दर मात्र कोसळताना दिसतोय. आज पुण्यात चांदीच्या दरात 300 रुपयांची घसरण पहायला मिळाली. आज पुण्यात एक किलो चांदीचा दर 62 हजार 200 रुपये आहे. काल एक किलो चांदीचा दर हा 62 हजार 500 इतका होता. आज एका दिवसात चांदीचा दर 300 रुपयांनी पडला आहे.

12 ऑगस्टपासून सातत्यानं वाढतोय सोन्याचा दर

पुण्यात 12 ऑगस्टपासून सोन्याचा दर रोज वाढतोय. 11 ऑगस्टला पुण्यात सोन्याचा दर 22 कॅरेटसाठी प्रतितोळा 44 हजार 440 होता. त्यात रोज वाढ होत आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या दरातही रोज वाढ होत असल्याचं दिसतंय. 11 ऑगस्टला 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर 47 हजार 520 होता. साधारण एका आठवड्यात सोन्याचा दर 1300 रुपयांनी वाढला आहे.

जुलै महिन्यात वाढला सोन्याचा दर

पुण्यात सातत्यानं सोन्याच्या भावात चढ-उतार पहायला मिळतोय. गेल्या महिन्यात 1 जुलैला पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळ 46 हजार 190 होता तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 47 हजार 190 होता. 31 जुलैला हा भाव वाढून 22 कॅरेटसाठी 46 हजार 600 तर 24 कॅरेटसाठी 49 हजार 870 झाला होता. जुलै महिन्यात पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दरानं उच्चांक गाठत 40 हजार 880 रुपयांपर्यंत पोहोचला होता. या महिन्यात सोन्याच्या दरात 5.68 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली.

संबंधित बातमी :

PHOTO: ‘हा’ प्रयोग यशस्वी ठरला तर सोने व्यापाराचा मोठा हिस्सा दुबईतून भारताकडे वळेल

Petrol Diesel Price: डिझेलच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण, जाणून घ्या आजचा दर

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट! लवकरात लवकर करा हे काम, अन्यथा पैशांची अडचण येणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.