15 दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर, पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळला पुन्हा अटक

15 दिवसांपूर्वीच मोहोळची कातिल सिद्दिकीच्या हत्या प्रकरणातून मुक्तता झाली. त्यानंतर मोहोळ टोळीनेही मारणे टोळीसारखाच ‘धुरळा’ केला होता. (Pune Goon Sharad Mohol arrested)

15 दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर, पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळला पुन्हा अटक
कुख्यात गुंड शरद मोहोळ
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 1:28 PM

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळला (Goon Sharad Mohol) पुन्हा अटक करण्यात आली आहे. मोहोळ अवघ्या 15 दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. 26 जानेवारील शरद मोहोळने हजेरी लावलेल्या कार्यक्रमात धांगडधिंगा केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील खडक पोलिसांनी मोहोळला बेड्या ठोकल्या. (Pune Goon Sharad Mohol arrested 15 days after freed from Jail)

कोण आहे शरद मोहोळ?

शरद मोहोळ हा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. पुणे शहरातील मोहोळ टोळीचा तो म्होरक्या आहे. येरवडा तुरुंगातील अंडा सेलमध्ये नाडीने गळा आवळून सिद्दीकीचा खून केल्याचा मोहोळवर आरोप होता. 15 दिवसांपूर्वीच मोहोळची कातिल सिद्दिकीच्या हत्या प्रकरणातून मुक्तता झाली. त्यानंतर मोहोळ टोळीनेही मारणे टोळीसारखाच ‘धुरळा’ केला होता.

दरम्यान, शरद मोहोळविरोधात आता कलम 143, 188, 37 (3) अंतर्गत फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम, 51 बी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शरद मोहोळ 26 जानेवारीला ज्या कार्यक्रमाला हजर राहिला होता, त्यावरुन खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहोळ याच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीनशे ते पाचशे चारचाकी गाड्या घेऊन काढली मिरवणूक

मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणेची सोमवारी तळोजा कारागृहातून मुक्तता झाली. त्यानंतर त्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जवळपास तीनशे ते पाचशे चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक निघाली. यावेळी मारणेचे साथीदार द्रुतगती महामार्गावर थांबून आरडाओरडा करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते. या धांगडधिंगा प्रकरणात पोलिसांनी गजा मारणेला अटक केली आहे. (Pune Goon Sharad Mohol arrested)

चित्रा वाघ यांची टीका

महाविकास आघाडी सरकारच्या काळात खून किंवा बलात्कार ही सामान्य घटनेसारखी बाब झाली आहे. पण आता तुरुंगातून सुटल्यावर नामचीन गुंड मिरवणूक काढायची हिंमत करु लागले आहेत. हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचा पुरावा आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली.

सरकारच्या अस्तित्वहीनतेचाही पुरावा – चित्रा वाघ

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर तो मंगळवारी तळोजा कारागृहातून बाहेर आला होता. यानंतर गजानन मारणे समर्थकांनी त्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढली होती. याच मुद्द्यावरुन चित्रा वाघ यांनी ट्विट करुन राज्य सरकारला धारेवार धरले. तुरुंगातून सुटल्यावर एखादा नामचीन गुंड मिरवणूक काढायची हिंमत करतो. कोणीही गुंड खुलेआम दणक्यात वाढदिवस साजरा करतो. हे चांगल्या समाजासाठी लाजीरवाणं आहेच. पण हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचाही पुरावा आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

संबंधित बातम्या :

गजानन मारणेपाठोपाठ आता शरद मोहोळविरोधातही गुन्हा दाखल

धांगडधिंगा भोवला! कुख्यात गुंड गजा मारणेला पोलिसांकडून अटक

(Pune Goon Sharad Mohol arrested 15 days after freed from Jail)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.