AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात सर्वात मोठा हेलिकॉप्टरचा ताफा पुणे शहरात, किती हेलिकॉप्टर आहेत पुण्यात अन् कशासाठी होतो वापर

Pune News : पुणे शहरात देशात सर्वाधिक वाहने आहेत. कारण पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट नाहीत. परंतु राज्यकर्त्यांनी आता पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर लक्ष दिले आहे. त्यावेळी देशात सर्वाधिक हेलिकॉप्टर पुण्यात असल्याची माहिती समोर आलीय.

देशात सर्वात मोठा हेलिकॉप्टरचा ताफा पुणे शहरात, किती हेलिकॉप्टर आहेत पुण्यात अन् कशासाठी होतो वापर
helicopter
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 9:39 AM

पुणे | 18 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात उद्योग आणि शिक्षण या सुविधा चांगल्या आहे. यामुळे शिक्षणाबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहे. पुणे शहराचा विस्तार चारही बाजूंनी झाला आहे. परंतु पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत नसल्यामुळे वैयक्तीक वाहने वापरण्यावर पुणेकर भर देतात. यामुळे देशात पुणे शहरात वाहने मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु आणखी एक माहिती नागरिक उड्डयन महानिदेशालय म्हणजे डिजीसीएकडून मिळाली आहे. पुणे शहरात वाहनेच नाही तर देशात सर्वाधिक हेलिकॉप्टर आहेत.

पुण्यात सर्वाधिक हेलिकॉप्टरचा ताफा

पुणे शहरात सर्वाधिक हेलिकॉप्टरचा ताफा असल्याची माहिती डीजीसीएचे सदस्य नितीन वेल्डे यांनी दिले. मुंबईत हेलिकॉप्टरचा ताफा मोठा आहे, परंतु त्याचा वापर ओएनजीसीकडून कंपनीच्या कामासाठी केले जातो. परंतु पुण्यातील ताफ्याचा वापर नागरिकांसाठी होत आहे.

पुणे शहरात कशासाठी वापरता हेलिकॉप्टर

पुणे शहरातील नागरी विमानतळ नाही. लष्काराच्या लोहगाव विमानतळावरुन विमानांचे उड्डान होते. परंतु हेलिकॉप्टरचा सर्वाधिक ताफा पुण्यात आहेत. पुण्यात काही खाजगी हेलिकॉप्टर आहेत तर काही कंपन्यांच्या मालकीचे आहेत. या हेलिकॉप्टरचा वापर सामान्य लोकांसाठी होत आहे. अगदी जॉयराइड्साठी वापर केला जात आहे. एका व्यक्तीने त्याच्या आईच्या वाढदिवसासाठी अर्ध्यातासाचे जॉयराइड घेतले. काही जण लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हेलिकॉप्टर वापरत आहेत.

हे सुद्धा वाचा

एकट्या पुण्यात किती हेलिकॉप्टर

नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA) यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील 231 हेलिकॉप्टर आहेत. त्यापैकी फक्त पुण्यात 16 हेलिकॉप्टर आहेत. 19 हेलिकॉप्टर विविध राज्य सरकारच्या मालकीचे आहेत. महाराष्ट्र सरकारकडेही स्वत:चे हेलिकॉप्टर आहे. तसेच 82 हेलिकॉप्टर विविध कंपन्यांच्या मालकीचे आहे.

पुणे, मुंबईला प्राधान्य

हेलिकॉप्टर सर्व्हिसेस देणारी फ्लाय ब्लेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ऑपरेशन्स प्रमुख संजीव पासवान म्हणाले की, “ आम्ही सर्वप्रथम पुण्यात आमची सेवा सुरू केली. याला चांगला प्रतिसाद आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत पुण्याच्या ताफ्यात आणखी दोन ते तीन हेलिकॉप्टर येणार आहेत. पुणे ते मुंबई आणि मुंबई ते शिर्डी या आमच्या लोकप्रिय राइड आहेत. अनेक नागरिक आमच्या सेवा जॉयराईडसाठी वापरत आहेत.