हनी ट्रॅप प्रकरणातील प्रदीप कुरुलकर याची पॉलिग्राफ चाचणी होणार का? कोर्टाने काय दिला निर्णय

Pune News Honey Trap : पुणे येथील हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रदीप कुरुलकर न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची पॉलीग्राफ चाचणी घेण्याची मागणी एटीएसने केली आहे. न्यायालयात त्यासंदर्भात सोमवारी सुनावणी झाली.

हनी ट्रॅप प्रकरणातील प्रदीप कुरुलकर याची पॉलिग्राफ चाचणी होणार का? कोर्टाने काय दिला निर्णय
pradeep kurulkar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 4:45 PM

योगेश बोरसे, पुणे : पुणे येथील डीआरडीओ संचालक असलेले डॉ. प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले. पाकिस्तानी गुप्तहेर असलेल्या या महिलेच्या कुरुलकर संपर्कात होते. या प्रकरणी ४ मे रोजी त्यांना अटक झाली होती. एटीएसकडून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. परंतु या चौकशीत त्यांच्यांकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे कुरुलकर यांची पॉलीग्राफ चाचणी करण्याची तयारी एटीएसने सुरु केली आहे. या चाचणीसाठी परवानगी मिळवण्यासाठी पुणे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी झाली.

न्यायालयाने काय दिला निर्णय

डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरण सुनावणी आता ३० जून रोजी होणार आहे. प्रदीप कुरुलकर यांच्या मुख्य दोन चाचण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी एटीएस कडून करण्यात आली होती. त्यात लाय डिटेक्टर चाचणी अन् पॉलीग्राफ चाचणीचा समावेश आहे. विशेष तपास पथकाने या चाचण्या करण्यास परवानगी मिळण्यासाठी पुणे न्यायलायात अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी होणार होती. परंतु सोमवारी याप्रकरणी कोर्टाने ३० जूनपर्यंत ही सुनावणी तहकूब केली आहे.

पॉलीग्रॉफ चाचणी होणार

DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात आहे. परंतु चौकशीत वेगवेगळी अन् दिशाभूल करणारी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे त्यांची पॉलीग्राफ टेस्ट करण्याचा निर्णय एटीएसने घेतला. या पॉलीग्राफ चाचणीत रक्तदाब, नाडी आणि श्वासोच्छवासाची गती यावर सत्य, असत्य शोधता येते. त्यामुळे कुरुलकर खरी माहिती देत आहे की दिशाभूल करत आहे, हे या चाचणीतून स्पष्ट होणार आहे.

हे सुद्धा वाचा

फॉरेन्सिक अहवाल होता विरोधात

प्रदीप कुरुलकर याने व्हॉट्सॲपने पाकिस्तानी गुप्तहेरास ईमेल आयडी दिला होता. तपास संस्थांना त्याची लोकेशन पाकिस्तान असल्याची माहिती मिळाली. तसेच त्या मेलवरुन काही माहिती पाकिस्तानला दिल्याचे निष्पन्न झाले आहे. पाकिस्तानात माहिती पाठवण्यासाठी कुरुलकर त्या ईमेल आयडीचा वापर करत होता. त्या ईमेलमधून कुरुलकर याने गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचे फॉरेन्सीक अहवालातून स्पष्ट झाले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.