Pune honey trap : डीआरडीओ गेस्टहाऊसमध्येच महिलांशी गाठीभेटी, पाकिस्तानशी कसा होत होता संपर्क

Pune honey trap : पुणे येथील डीआरडीओच्या एका बड्या अधिकाऱ्याला सहा दिवसांची ATS कोठडी सुनावण्यात आली आहे. संबंधित अधिकारी हा डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्येच महिलांना भेटत होता. पाकिस्तानच्या तो संपर्कात होता.

Pune honey trap : डीआरडीओ गेस्टहाऊसमध्येच महिलांशी गाठीभेटी, पाकिस्तानशी कसा होत होता संपर्क
drdo scientist
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 9:35 AM

पुणे : पुणे DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाचे संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. पुणे विशेष कोर्टाने कुरुलकर त्याला सहा दिवसांची ATS कोठडी दिली आहे. यावेळी एटीएसने कोर्टात कोठडी मागताना अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. प्रदीप कुरुलकर गेस्ट हाऊसमध्येच महिलांना भेटत होते, असा दावा एटीएसने केलाय.

पाकिस्तानशी कसा होता संपर्क

डॉ. प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात होते. ई मेलमार्फत त्यांचा हा संपर्क होत होता. डीआरडीएच्या गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिलांना भेटत होता, असा दावा एटीएसने न्यायालयात केला. कुरुलकर याच्या लॅपटॉप आणि मोबाईलचा अहवाल आता प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने चौकशी करायची आहे. त्याने मोबाइल फोन, लॅपटॉप आणि पेन ड्राइव्हमधील डेटा डिलीट केला. तो डेटा नक्की काय होता. त्याने पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाला काय माहिती दिली, याचा तपास करण्यासाठी एटीएसने कोठडी मागितली.

हे सुद्धा वाचा

दोन पासपोर्ट

कुरुलकर याच्याकडे दोन पासपोर्टही सापडले आहे. शासकीय पासपोर्ट वापरुन पाच ते सहा देशांचा दौरा केला आहे. या देशांमध्ये कोणास व का भेटला याचा तपास आता एटीएस करणार आहे. एटीएसच्या दाव्यानंतर न्यायालयाने म्हटले की, काही फोटो आणि डाटा दुसऱ्या देशासोबत शेअर करण्यात आला आहे. हे सगळं प्रकरण संवेदनशील आहे. जर काही हालचाली संशयास्पद असतील, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असतील तर दुर्लक्ष करता येणार नाही, या प्रकरणी 15 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात येत आहे.

‘रॉ’कडून चौकशी

संशोधन आणि विश्लेषण विभाग म्हणजे ‘रॉ’कडून आता प्रदीप कुरुलकर याची चौकशी केली जात आहे. त्याचे जप्त केलेल्या लॅपटॉप, तीन मोबाईल आणि संगणकाची हार्ड डिस्कमधून काय माहिती मिळाली, त्याचे विश्लेषण रॉचे अधिकारी करत आहेत. तसेच पाकिस्तानमध्ये ते कोणाच्या संपर्कात होते, त्याची माहिती जाणून घेत आहेत. पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये ते अडकले? हे ही जाणून घेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.

डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हनीट्रॅपमध्ये अडकले. त्याला निवृत्त होण्यासाठी फक्त 6 महिने बाकी आहेत. परंतु निवृत्तीपूर्वीच हे प्रकरण उघड झाले. DRDO ची व्हिजिलेंस व इंटीलिजेंस टीम अनेक महिन्यांपासून त्याच्यावर नजर ठेवून होती.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.