AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे हनी ट्रॅप प्रकरणात एटीएसची मोठी कारवाई, कुरुलकरच्या मोबाईलमध्ये महिलांचे अश्लील फोटो

Pune News Honey Trap : पुणे शहरातून उघड झालेले हनी ट्रॅप प्रकरण आता गंभीर होऊ लागले आहे. या प्रकरणी डीआरडीओ संचालकास अटक झाल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये अश्लिल फोटो सापडले आहे. कुरुलकर याचे बँकेचे व्यवहार तपासले जात आहे.

पुणे हनी ट्रॅप प्रकरणात एटीएसची मोठी कारवाई, कुरुलकरच्या मोबाईलमध्ये महिलांचे अश्लील  फोटो
Honey trap
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 10:14 AM

प्रदीप कापसे, पुणे : पुणे येथील डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये अडकले आहे. पाकिस्तानी महिला गुप्तहेरच्या जाळ्यात ते सापळले. आता एटीएसकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीत धक्कादायक माहिती मिळत आहे. पुणे एटीएसला प्रदीप कुरुलकरच्या मोबाइलमध्ये महिलांचे अश्लिल फोटो मिळाले आहे. तसेच त्याच्या बँकींग व्यवहाराची तपासणी सुरु केली आहे. त्यातून आर्थिक व्यवहाराची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

बँकेचे व्यवहार सील

पुणे एटीएसने बँकेचे सगळे व्यवहार सील केले आहे. त्याची बँकिंग प्रणाली ताब्यात घेऊन ती फॉरेन्सिक लॅबकडे पाठवली आहे. पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिच्याशी संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोन महिलांचे जबाब नोंदवले आहे.

हे सुद्धा वाचा

महिलांचे अश्लिल फोटो

प्रदीप कुरुलकर याच्या मोबाईलची तपासणी सुरु आहे. या तपासणीत महिलांचे अर्धनग्न फोटो मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच कुरुलकर याने व्हॉटस ॲपवरूनचं मेल आयडी दिल्याचं उघड झाले आहे. त्याचं कंट्री लोकेशन पाकिस्तान दाखवतंय. कुरुलकर प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल तपास संस्थांना मिळाला आहे. त्या अहवालानुसार कुरुलकर यांनी ईमेल द्वारे काही माहिती पाकिस्तानला दिल्याचे निष्पन्न झाले आहे. परदेशात माहिती देण्यासाठी कुरुलकर एका ईमेल आयडीचा करत होते. त्या ईमेलमधून देशातील गोपनीय माहिती कुरुलकर यांनी दिल्याचे स्षष्ट झाले आहे.

पॉलीग्रॉफी चाचणी होणार

DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. येरवडा कारागृह त्याला ठेवण्यात आले आहे. परंतु या प्रकरणात त्याची पॉलीग्राफी टेस्ट करण्याचा निर्णय एटीएसने घेतला आहे. एटीएसला टेस्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे. पॉलिग्राफी टेस्टमध्ये माहिती मिळाली नाही तर नार्को टेस्ट ही केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पॉलीग्राफ चाचणी काय

पॉलीग्राफी चाचणीमध्ये, रक्तदाब, नाडी आणि श्वासोच्छवासाची गती यासारख्या शारीरिक क्रियाकलापांची नोंद केली जाते आणि या डेटाचा वापर व्यक्ती सत्य बोलत आहे की नाही हे शोधण्यासाठी केला जातो. दुसरीकडे, नार्को टेस्टमध्ये व्यक्तीची आत्मभान कमी होते ज्यामुळे तो मोकळेपणाने बोलू शकतो.

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.