AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Honey Trap : प्रदीप कुरुलकर याने दोन मोबाईलमधील डेटा केला डिलिट, आता एटीएसने उचलले हे पाऊल

Pune News Honey Trap : पुणे शहरातून उघड झालेले हनी ट्रॅप प्रकरणातील कोंडी अजूनही सुटली नाही. प्रदीप कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप एटीएसने केला आहे. यामुळे आता एटीएसने त्यांचा मोबाईलचा डेटा कव्हर करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

Pune Honey Trap : प्रदीप कुरुलकर याने दोन मोबाईलमधील डेटा केला डिलिट, आता एटीएसने उचलले हे पाऊल
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 1:09 PM

योगेश बोरसे, पुणे | 3 ऑगस्ट 2023 : पुणे येथील डीआरडीओ माजी संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी लैलाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. हे प्रकरण उघड झाल्यानंतर एटीएसने त्यांना अटक केली होती. DRDO चे संचालक राहिलेला प्रदीप कुरुलकर एटीएसला चौकशीत सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याची पॉलीग्राफ टेस्ट आणि व्हाईस लेअर चाचणी करण्याचा निर्णय एटीएसने घेतला आहे. त्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मागितली आहे. तसेच कुरुलकर याच्या दोन मोबाईलसंदर्भात मोठे पाऊल एटीएसने उचललले आहे.

काय करणार एटीएस

प्रदीप कुरुलकर चौकशीला सहकार्य करत नाही. यामुळे त्याचे जप्त केलेल्या दोन मोबाईलचा डेटा मिळवण्याचा प्रयत्न विशेष तपास पथक करत आहेत. कुरुलकर याने दोन मोबाईलमधील सर्व डेटा डिलिट केला होता. त्यामुळे एक मोबाईल राजस्थानमधील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्याचा निर्णय एटीएसने घेतला आहे. तसेच दुसरा मोबाईल दुरुस्त करण्यात येणार आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास अजून बाकी असल्याचे एटीएसच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.

कुरुलकरकडून जामिनसाठी अर्ज

डीआरडीओचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर डॉ. कुरुलकरकडून जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर नऊ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाकडून त्यांच्या जामीन अर्जास विरोध करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

या चाचण्यासंदर्भात होणार निर्णय

प्रदीप कुरुलकर याची व्हाईस लेअर चाचणी आणि पॉलिग्राफ चाचणी करण्यासाठी एटीएसकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. परंतु या दोन्ही चाचण्यांना कुरुलकर यांच्याकडून विरोध केला जात आहे. व्हाईस लेअर चाचणीस प्रदीप कुरुलकर याच्या परवानगीची गरज नसल्याचे एटीएसने म्हटले आहे. आता यासंदर्भात ९ ऑगस्ट रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण

‘डीआरडीओ’चा माजी संचालक राहिलेला प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तहेर झारा दासगुप्त हिला गोपनीय माहिती पुरवल्याचे उघड झाले आहे. देशातील संवेदनशील माहिती त्याने झारा दासगुप्ताच्या माध्यमातून पाकिस्तानला पुरवल्याचे तपासातून समोर आले. व्हॉटसॲप मेसेज, व्हिडिओ आणि व्हाइस कॉलद्वारे या पद्धतीने ही माहिती त्यांनी दिली.

मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती.
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे.