AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्यातील आरोपींना पाच तासात गजाआड; दोघांना ताब्यात

दरोडा पडल्यानंतर पोलीस तक्रार दाखल होताच अवघ्या चार ते पाच तासात पोलिसांना दरोड्याखोऱ्यांना गजाआड करण्यात आले. त्याबद्दल पोलिसांसाठी आतषबाजी करुन पोलिसांची स्वागत करण्यात आले.

इंदापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्यातील आरोपींना पाच तासात गजाआड; दोघांना ताब्यात
इंदापुरातील लोणी देवकरमध्ये दरोड्यातील दोघा आरोपींना ताब्यात Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 5:12 PM
Share

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर (Loni Deokar) येथे सोमवारी रात्री पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील आरोपींना अवघ्या पाच तासात तपास करुन आरोपींना गजाआड करण्यात इंदापूर पोलिसांना (Indapur Police) यश आले. या प्रकरणातील दोन आरोपींना इंदापूर पोलिसांनी पाठलाग करुन सिनस्टाईलने पकडून ताब्यात (Arrested ) घेण्यात आले आहे. तलावारीचा धाक दाखवून टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्यात सहा लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला होता. मोबाईल, सोन्याचे दागिने आणि कार या आरोपींकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत असून आणखी कोण कोण या गुन्ह्यात समावेश आहेत त्याचा शोध घेण्यात येत आहे. दरोडा पडल्यानंतर पोलीस तक्रार दाखल होताच अवघ्या चार ते पाच तासात पोलिसांना दरोड्याखोऱ्यांना गजाआड करण्यात आले. त्याबद्दल पोलिसांसाठी आतषबाजी करुन पोलिसांची स्वागत करण्यात आले.

चार तासात तपास

लोणी देवकरमधील डोंगरे वस्तीत सोमवारी रात्री अज्ञात आरोपींनी तलावारीचा धाक दाखवून मोबाईल आणि सोन्याचे दागिने लंपास केले होते. त्यानंतर आनंद डोंगरे यांच्या तक्रारीवरुन तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर इंदापूर पोलिसांनी चार तासात तपास करुन दोघांना ताब्यात घेण्यात आले, तर या गुन्ह्यातील अन्य आरोपी फरार झाले असून त्या आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणाती अन्य दोघा आरोपींवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल असून इतर आरोपींचाही तपास करण्यात येत आहे.

पोलिसांसाठी फटक्यांची आतषबाजी

लोणी देवकरमधील डोंगरे वस्तीत दरोडा पडल्यानंतर डोंगरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली. सीसीटीव्ही, विविध पोलीस स्थानकातून घेतलेली माहिती, परिसराची पाहणी पोलिसांच्या चार टीमद्वारे करण्यात आली. पोलिसांच्या चार टीमद्वारे तपास करण्यात आल्याने काही तासातच यामधील दोघा आरोपींना ताब्यात घेण्यास मदत झाली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे इंदापूर पोलिसांचे फटाक्यांची आतषबाजी करुन स्वागत करण्यात आले.

संबंधित बातम्या

Ambernath | आईला मारहाण करणाऱ्या दारुड्या बापाच्या हत्येचा प्रयत्न, अंबरनाथमध्ये सावत्र मुलांवर गुन्हा

Pune crime : प्रेमवीरानं घेतला प्रेयसीच्या गालाचा चावा, आता खातोय जेलची हवा!

वाळु माफियाकडून पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरने धडक दिल्याने पोलिस जखमी

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.