Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे पिफ चित्रपट महोत्सव लांबणीवर, आता ‘या’ तारखेला दमदार चित्रपटांची मेजवानी

राज्य तसेच पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) पुढे ढकलण्यात आली आहे. (pune international film festival corona pandemic)

कोरोनामुळे पिफ चित्रपट महोत्सव लांबणीवर, आता 'या' तारखेला दमदार चित्रपटांची मेजवानी
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 7:57 AM

पुणे : राज्य तसेच पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) (Pune International Film Festival) पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे उद्धाटन 11 मार्चला होणार आहे. पिफ चित्रपट महोत्वस 11 ते 18 मार्च या लावधित असेल.  (Pune International Film Festival has been postponed due to Corona pandemic)

पिफ चित्रपट मोहोत्सव लांबणीवर

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अमरावती, यवतमाळमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर तसेच पुण्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढतेय. त्यामुळे अशा परिस्थितीत चित्रपट मोहोत्सवाचे आयोजन करणे योग्य होणार नाही, असे मत पिफ चित्रपट मोहोत्सव आयोजकांचे आहे.  4 मार्चपासून सुरु होणाऱ्या पुण्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवाला पुढे ढकलण्यात आले आहे. हा चित्रपट महोत्सव 4 मार्चऐवची आता 11 ते 18 मार्चदरम्यान होणार आहे. तशी माहिती चित्रपट आयोजकांनी दिली आहे.

पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा काय?

राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुण्यातही कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. सध्या पुण्यात 721 कन्टेन्मेंट झोन असून 1 हजार 805 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाला 28 फेब्रवारीपर्यंत शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अभ्यासिका सुरु असल्या तरी सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य करण्यात आलं आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट रात्री 11 पर्यंतच खुले ठेवण्याची परवानगी आहे.

दरम्यान, पिफ चित्रपट महोत्सवात अनेक दर्जेदार चित्रपट दाखवले जातात. अनेक देशी तसेच विदेशी चित्रपटांच्या मेजवानीमुळे चित्रपट रसिक या चित्रपट मोहोत्सवाला आवर्जून हजेरी लावतात. मात्र, सध्या चित्रपट महोत्सव लांबणीवर पडल्यामुळे अनेकांकडून नाराजीही व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या :

VIDEO| नागपुरात कडक निर्बंधामुळे दोन दिवस दारूची दुकानं बंद; तळीरामांची दुकानांबाहेर रांग

मराठीही शिवरायांची भाषा, महाराज नसते तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असता का?; मुख्यमंत्र्यांनी खडसावले

IFFCO MT Recruitment 2021: इफ्कोमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीसाठी भरती, 28 फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज

(Pune International Film Festival has been postponed due to Corona pandemic)

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.